त्याचे विवाहबाह्य संबंध, हुंड्यासाठीही छळ केला; टीम इंडियाच्या क्रिकेटपटूवर पत्नीचे गंभीर आरोप
सध्या देशभरात आयपीएलचा धमाका सुरू आहे. स्पर्धा ऐन रंगात आलेली असतानाच एका प्रसिद्ध खेळाडूच्या पत्नीने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केल्याने क्रिकेटजगतात खळबळ उडाली आहे. अमित मिश्रा असे त्या खेळाडूचे नाव असून सध्या तो टीम इंडियाचा माजी फिरकीपटू होता. अमितची पत्नी गरिमा हिने त्याच्यावर हुंड्यासाठी छळ केला तसेच त्याचे इतर महिलांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. गरिमा मिश्रा हिने किडवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान अमित मिश्राने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
अमित मिश्रा हा गेल्या काही वर्षांपासून तो कानपूरमधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करतो. अमितचे 2021 मध्ये गरिमासोबत लग्न झाले. गरिमाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अमित व त्याचे कुटुंबीय हुंड्यासाठी तिचा छळ करतात. त्यांना होंडा सिटी कार आणि १० लाख रुपये हवे आहेत. तसेच अमितचे अनेक महिलांसोबत संबंध आहेत.
दरम्यान अमितने त्याची पत्नीच त्याचा छळ करत असल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने त्याला मारहाणही केली होती असे त्याने सांगितले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List