स्वामी समर्थांमध्ये घडणार हनुमान तत्वाचा साक्षात्कार; भक्तांसाठी स्वामींचा अलौकिक संदेश
कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत हनुमान जयंतीनिमित्त दाखविण्यात येणारा विशेष भाग प्रेक्षकांसाठी एक गूढ, अध्यात्मिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. "जगात दैवत्व एकच, देवा देवात भेद केलास आत्मपरीक्षण कर" स्वामींचा हा अलौकिक संदेश या भागात प्रकट होतो.
या विशेष भागात स्वामी समर्थांच्या रूपात हनुमंत तत्वाचा साक्षात्कार होणार असून, स्वामींच्या चमत्कारिक रूपाने भक्तांना नव्या भक्तिभावाची प्रचिती येणार आहे.
या भागात अवधूत नावाच्या एका मारुतीभक्ताची कथा केंद्रस्थानी आहे, जो इतर कोणत्याही देवतेला मानत नाही. स्वामींचा स्वीकार न करणारा हा भक्त मंदिर उभारणीच्या कामात अडथळे येऊ लागल्यामुळे संभ्रमात पडतो. त्याला वाटतं की स्वामी हेच कारण आहेत. मात्र नाट्यमय घटनांनंतर त्याला जाणवतं की स्वामी समर्थ हेच हनुमंत तत्वाचे साक्षात स्वरूप आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List