“आयुष्याच्या त्या टप्प्यावर..”, मलायका अरोराने काढलेल्या नवीन टॅटूची चर्चा; नक्की अर्थ काय?
बॉलिवूडमधील असे अनेक घटस्फोट चर्चेत राहणारे आहेत. पण त्यातील एक घटस्फोट जो कायम चर्चेत राहतो तो म्हणजे मलायका आणि अर्जुन कपूरचा.अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या टॅटूमुळे.
मलायकाच्या नवीन टॅटूची चर्चा
मलायकाने आतापर्यंत अनेक टॅटू काढले आहेत. तिने पुन्हा एक नवीन टॅटू काढला, ज्याबद्दल ती बोलली आहे. मलायका अलीकडेच एका कार्यक्रमात गेली होती जिथे तिच्या नवीन टॅटूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मलायकाने तिच्या नवीन टॅटूबद्दल सांगितलं. मलायकाने स्वतः तिच्या टॅटूचा अर्थ सांगितला. ती म्हणाली की, हा टॅटू तिच्या आयुष्यात काहीतरी नवीन भर घालत आहे.
टॅटूबद्दल ती काय म्हणाली?
मलायका अरोराने एका मुलाखतीत तिच्या टॅटूबद्दल ती म्हणाली की, “माझ्यासाठी, आयुष्याच्या त्या टप्प्यावर टॅटू आले. मी हे टॅटू असेच नाही काढले आहेत. त्याचा एक काहीतरी अर्थ आहे. 2024 हे वर्ष माझ्यासाठी कठीण गेलं आहे. मलायका अरोराने तिच्या हातावर ‘सब्र और शुकर’ लिहिलेल्या टॅटूचा काढला आहे. मलायकाने आता तिच्या टॅटूचा अर्थ सांगितला आहे. ती म्हणाले की सबर म्हणजे संयम आणि शुकर म्हणजे कृतज्ञता. गेल्या वर्षीच्या तुलनेत आज मी कुठे आहे याचा विचार करताना हे शब्द माझ्या मनात कायम असतात.”
2024 हे वर्ष मलायकासाठी खूप कठीण गेलं….
2024 हे वर्ष मलायकासाठी खूप कठीण गेले आहे. तिचे वडील अनिल मेहता यांचं निधन झालं.तर, दुसरीकडे, अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाला. वडिलांच्या निधनानंतर अर्जुन कपूर मलायकाच्या पाठीशी उभा राहिला. कामाच्या बाबतीत बोलायचं झाले तर, मलायका सध्या रेमो डिसूझासोबत एका रिअॅलिटी शोची जज आहे. मलायका तिच्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच तिला खूप आवडही आहे. तिच्यामुळे शोला एक ग्लॅमर प्राप्त होतं. मलायकाने अनेक रिअॅलिटी शोज जज केले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List