12 वर्षांच्या बालकीर्तनकाराकडून बंजारा भाषेतील कीर्तन ऐकून सर्वजण थक्क; जिंकली प्रेक्षकांची मनं

12 वर्षांच्या बालकीर्तनकाराकडून बंजारा भाषेतील कीर्तन ऐकून सर्वजण थक्क; जिंकली प्रेक्षकांची मनं

सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर वेगवेगळ्या वयोगटातील अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. या सहभागी स्पर्धकांमध्ये सर्वात लहान स्पर्धकही आली आहे, जिने आपल्या कीर्तनातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कीर्तनकारांना उत्तम व्यासपीठ मिळून देणारा हा मंच आणि सहभागी स्पर्धक यांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ।।
कोणी व्हारे अधिकारी । त्यासी हरी देईल ।।
आंगी वैराग्याचे बळ । साही खळ जिणावे ।।
उरेल ना उरी । तुका करी बोभाट ।।

तुकाराम महाराज म्हणतात, देव स्वतःहून कीर्तन करणाऱ्यांच्या कीर्तनात गोडी आहे की नाही ते ठरवतो आणि गोडी मिळाल्यास तिथं स्वतः जातीने हजर राहतो अन्यथा नाही. आजवर प्रत्येकाने कीर्तन ऐकलं असेल मात्र बंजारी भाषेत कीर्तन हे ऐकून तुमचेही कान तृप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’च्या मंचावर सर्वात चिमुरड्या 12 वर्षीय ह.भ.प. यशस्वीताई आडे महाराजांचं बंजारा भाषेतलं कीर्तन ऐकण्याची सुवर्णसंधी या शोच्या निमित्ताने महाराष्ट्राला उपलब्ध झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

घरातील धामिर्क कार्यक्रमांमुळे ह. भ. प. यशस्वीताई आडे लहानपणापासूनच कीर्तनाची गोडी लागली. या मंचावर ह.भ प. यशस्वीताई आडे यांनी बंजारा भाषेतील संत सेवालाल यांचं कीर्तन करून उपस्थित प्रेक्षक आणि परीक्षकांना मंत्रमुग्ध केलं. ‘छोटी मुक्ताई’ असा गौरव परीक्षकांनी यावेळी केला. संत नामदेवांचं कीर्तनही तिने यावेळी सादर केलं. गुरुवारी हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

केवळ भाषेच्या बंधनात अडकून न राहता कीर्तनाचा प्रसार आणि प्रचार वेगवगळ्या भाषांच्या माध्यमातून होत ज्या वयात मनसोक्त खेळायचं, बागडायचं, आईवडिलांकडे हट्ट करायचा असं ह.भ.प. यशस्वीताई आडे हिचं वय. मात्र, ही चिमुरडी आज आपल्या रसाळ वाणीतून वारकरी संप्रदायाची महती साता समुद्रापार पोहोचावी यासाठी प्रयत्न करतेय. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार…’ हा रिअ‍ॅलिटी शो सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Nirupam :  ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले? Sanjay Nirupam : ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?
“तुम्ही तुमच्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये बिगर हिंदूला सदस्य बनवणार का? हा सुप्रीम कोर्टाचा प्रश्नच एकदम चुकीचा आहे. कारण असं आहे की,...
हे तर पडद्यामागचे राजकारण…हिंदीच्या सक्तीवरून संजय राऊत यांनी धु धु धुतले; कशासाठी घेतला निर्णय, दिले हे कारण
‘भारतात जातीवाद आहे की नाही? एकदाच काय ते ठरवा’; अनुराग कश्यप का भडकला?
3 दिवस कुजत राहिला काजोलच्या आजीचा मृतदेह, वयाच्या 84 व्या वर्षी हृदयद्रावक अंत
इतर महिलांकडे पाहिल्यावर आकर्षित होता का? लक्ष्मीकांत बेर्डे यांचं प्रामाणिक उत्तर
सूडबुद्धीने निलंबित केलेल्या शिक्षक गिरीश फोंडेंवरील कारवाई मागे घ्या, कोल्हापूर महापालिकेवर शिक्षकांचा मोर्चा मूक मोर्चा
महाराष्ट्राचा आत्मा, भाषा, संस्कार मराठीच! ही आमची राजभाषा, इथे मराठीच चालणार; संजय राऊत यांनी ठणकावले