करीना कपूर या गोष्टीशिवाय जगू शकत नाही, 2-3 दिवस जरी ती गोष्ट मिळाली नाही तरी होते अस्वस्थ

करीना कपूर या गोष्टीशिवाय जगू शकत नाही, 2-3 दिवस जरी ती गोष्ट मिळाली नाही तरी होते अस्वस्थ

बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्री स्वत:च्या आरोग्याबाबत आणि डाएटबाबत किती काटेकोर असतात. त्यामध्येच एक नाव आहे करीना कपूर खान. करीना ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या आरोग्याची खूप काळजी घेते. तिच्या अभिनय आणि स्टाईल व्यतिरिक्त, ती तिची फिगर मेंटेन करण्यासाठी चांगला डाएट घेते. पण सोबतच करीना खूप खवय्यी आहे.

तिला दररोज काहीना काही तरी वेगळं खायला आवडतं

तिला दररोज काहीना काही तरी वेगळं खायला आवडतं. करीनाने एकदा सांगितले होते की ती रोज एकसारखे अन्न खाऊ शकत नाही. पण एक डिश अशी आहे जी करीनाला प्रचंड आवडते. ती या पदार्थासाठी इतकी वेडी आहे की 2-3 दिवस जरी खाल्ली नाही तर तिला क्रेविंग सहन होत नाही. अलीकडेच एका कार्यक्रमात करीनाने तिच्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगितलं. कोणती डिश आहे माहितीये?

करीनाने तिच्या फेव्हरेट डिशबद्दल सांगितलं

अलिकडेच करीना कपूर एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी ती अतिशय आकर्षक लूकमध्ये दिसली. तिने सैल डेनिम जीन्ससह जांभळ्या रंगाचा वर्क शर्ट घातला होता. यासोबतच तिने उंच टाचांचे शूजही घातले होते. तसेच तिने कमीत कमी मेकअपने लूक पूर्ण केला होता. करीनाचा लूकही चाहत्यांना आवडला. पण या कार्यक्रमात झालेल्या चर्चेमध्ये करीनाने तिच्या फेव्हरेट डिशबद्दलही सांगितलं.

या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये करीनाने तिच्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगितले. ती म्हणाली की तिचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे खिचडी. जर तिने 2 ते 3 दिवस जरी खिचडी खाल्ली नाही तर तिला क्रेविंग सहन होत नाही असंही तिने म्हटलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


करीना कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास….

गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर अनेक कार्यक्रमांमध्ये दिसली. त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना सर्व कार्यक्रमांमधले करीनाचे सर्व लूक खूप आवडले . कधी ऑफ-व्हाइट रंगाच्या लेहेंग्यात तर कधी ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये, करीना अतिशय सुंदर दिसत होती. अलीकडेच करीनाने पती सैफ, मुले आणि संपूर्ण कुटुंबासह ईद साजरी केली. करीना ‘सिंघम अगेन’ चित्रपटात शेवटची दिसली होती. आता, ती लवकरच मेघना गुलजारच्या ‘दायरा’ आणि ‘वीरे दी वेडिंग 2’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत सरकारशी पंगा घेऊन खटला जिंकणारे एकमेव अभिनेते; सत्तेच्या तोंडावर नाकारली चित्रपटाची ऑफर भारत सरकारशी पंगा घेऊन खटला जिंकणारे एकमेव अभिनेते; सत्तेच्या तोंडावर नाकारली चित्रपटाची ऑफर
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आले आणि गेले, परंतु दिग्ग्ज अभिनेते मनोज कुमार यांच्यासारखं दुसरं कोणी नव्हतं. हिंदी सिनेसृष्टीत अनेक हिट...
मनोज कुमार यांचे गाजलेले ‘5’ सिनेमे, मोडले होते सर्व रेकॉर्ड
भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या मनोज कुमार यांचा सुपरस्टारपर्यंतचा प्रवास
सागर कारंडेंना इन्स्टाग्रामवर लाईक्स मिळवणं पडलं महागात, 61 लाखांची फसवणूक, काय आहे प्रकरण?
गावठी कट्टे, जिवंत काडतुसांसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेवगाव पोलिसांची कारवाई; आठ आरोपी गजाआड
वादळी पावसाने पुण्याला झोडपले! झाडे पडली, रस्त्यांवर पाणी, वाहतूककोंडी
डोंबिवली-ठाणे प्रवास धोक्याचा; कोपर-दिवा दरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू