रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर नारळाचं तेल लावण्याचे हे आहेत फायदे

रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर नारळाचं तेल लावण्याचे हे आहेत फायदे

आपल्यापैकी बरेच जण नारळाचं तेल केवळ केसांसाठीच उपयुक्त आहे असं मानतात. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हे तेल चेहऱ्यासाठीही तेवढंच प्रभावी ठरू शकतं! विशेषतः रात्री झोपण्याआधी याचा योग्य वापर केल्यास त्वचेवर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात.

त्वचेचं पुनरुत्थान रात्रीच जास्त प्रभावी!

तज्ज्ञ सांगतात की रात्री झोपताना त्वचेत पुनरुत्पादनाची प्रक्रिया वेगाने सुरू होते. याच वेळी जर चेहऱ्यावर नारळाचं तेल लावलं गेलं, तर ते त्वचेला खोलवर पोषण देतं आणि निखार आणतं.

कोरडी, निर्जीव त्वचा होते मऊ आणि तजेलदार

नारळाच्या तेलामध्ये असतात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक. हे घटक त्वचेचा कोरडेपणा दूर करत मृदूता प्रदान करतात. थंडीत किंवा उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडते, अशावेळी हे तेल वरदान ठरू शकतं.

सुरकुत्यांवर प्रभावी उपाय

चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या आणि फाईन लाईन्स यासाठीही नारळाचं तेल प्रभावी आहे. यामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला वृद्धत्वाच्या लक्षणांपासून वाचवतात. व्हिटॅमिन ई त्वचेला लवचिक ठेवतं आणि डाग कमी करतं.

कसं वापराल नारळाचं तेल?

दिवसभरातील धूळ, घाम आणि मेकअपचा थर त्वचेला त्रासदायक ठरू शकतो, म्हणून चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोरड्या टॉवेलने चेहरा हलक्या हाताने पुसा.आता थोडंसं नारळाचं तेल तुमच्या हातावर घ्या. दोन्ही हात एकमेकांवर चोळून तेल किंचित कोमट करा. मग हे तेल चेहऱ्यावर लावा. तेल लावताना हलक्या हाताने गोलाकार मालिश करा. यामुळे तेल त्वचेत खोलवर शोषले जाईल आणि रक्ताभिसरणही सुधारेल.हे तेल रात्रभर चेहऱ्यावर ठेवणं सर्वात फायदेशीर असतं. कारण रात्रीच्या वेळेस त्वचेची पुनरुत्पादन प्रक्रिया अधिक सक्रिय असते. सकाळी उठल्यावर सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा.

शतकानुशतकांपासून वापरलं जाणारं नारळाचं तेल आता आधुनिक विज्ञानानेही त्वचेसाठी उपयुक्त असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे रासायनिक उत्पादनांपेक्षा हा नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Nirupam :  ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले? Sanjay Nirupam : ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?
“तुम्ही तुमच्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये बिगर हिंदूला सदस्य बनवणार का? हा सुप्रीम कोर्टाचा प्रश्नच एकदम चुकीचा आहे. कारण असं आहे की,...
हे तर पडद्यामागचे राजकारण…हिंदीच्या सक्तीवरून संजय राऊत यांनी धु धु धुतले; कशासाठी घेतला निर्णय, दिले हे कारण
‘भारतात जातीवाद आहे की नाही? एकदाच काय ते ठरवा’; अनुराग कश्यप का भडकला?
3 दिवस कुजत राहिला काजोलच्या आजीचा मृतदेह, वयाच्या 84 व्या वर्षी हृदयद्रावक अंत
इतर महिलांकडे पाहिल्यावर आकर्षित होता का? लक्ष्मीकांत बेर्डे यांचं प्रामाणिक उत्तर
सूडबुद्धीने निलंबित केलेल्या शिक्षक गिरीश फोंडेंवरील कारवाई मागे घ्या, कोल्हापूर महापालिकेवर शिक्षकांचा मोर्चा मूक मोर्चा
महाराष्ट्राचा आत्मा, भाषा, संस्कार मराठीच! ही आमची राजभाषा, इथे मराठीच चालणार; संजय राऊत यांनी ठणकावले