हेअर स्पा केल्यानंतर केस तर चमकतात, पण मुळांवर काय परिणाम होतोय? एकदा नक्की वाचा

हेअर स्पा केल्यानंतर केस तर चमकतात, पण मुळांवर काय परिणाम होतोय? एकदा नक्की वाचा

सध्या तरुणाईपासून ते प्रौढांपर्यंत अनेक लोक केसांची निगा राखण्यासाठी विविध उपचारांचा अवलंब करत आहेत. त्यात ‘हेअर स्पा’ हा प्रकार विशेषतः लोकप्रिय आहे. केस गळती, ड्राय स्काल्प, कोंडा किंवा केसांना अधिक चमकदार बनवण्यासाठी हेअर स्पा केला जातो. मात्र या उपचारामागील वैज्ञानिक आधार, वापरण्यात येणारे रसायनांचे स्वरूप आणि दीर्घकालीन परिणाम याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याचे काही दुष्परिणामही समोर येत आहेत. यातले काही दुष्परिणाम म्हणजे…

केमिकलयुक्त प्रॉडक्ट्समुळे टाळूला होणारी अ‍ॅलर्जी, नैसर्गिक ओलसरतेचा अभाव, कोरडी पडणारी टाळू आणि त्यातून होणारा डॅंड्रफ… हे सगळं जाणून घेतल्यावर तुम्ही हादरून जाल. आणि हो, तुमच्या रंगवलेल्या केसांचा नैसर्गिक रंगही हळूहळू फिका पडू शकतो! हेअर स्पा तात्पुरता आराम देतो, पण दीर्घकालीन परिणाम धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे पुढच्यावेळी हेअर स्पाचा विचार करत असाल, तर एकदा नक्की विचार करा हा सौंदर्याचा मार्ग आहे की धोका?

 

१. सौंदर्याच्या नावाखाली होणारे दुष्परिणाम

हेअर स्पामध्ये वापरले जाणारे अनेक प्रॉडक्ट्स हे रासायनिक असतात. यामध्ये केमिकल बेस्ड शॅम्पू, क्रीम्स आणि मास्क्सचा समावेश असतो. सुरुवातीला यामुळे केस नरम आणि सुंदर वाटतात, पण दीर्घकाळ वापरल्यास टाळूची नैसर्गिक आर्द्रता कमी होते आणि केस अधिक कोरडे होतात.

२. संवेदनशील टाळूसाठी धोका वाढतो

ज्यांची टाळू अत्यंत सेंसिटिव्ह आहे, त्यांच्यासाठी हेअर स्पा धोकादायक ठरू शकतो. टाळूला अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता वाढते. केमिकल्सचा थेट परिणाम टाळूवर होतो आणि केस गळण्याची समस्या अधिक गंभीर बनू शकते.

३. केसांचा नैसर्गिक रंग फिकट होतो

जर तुम्ही केस रंगवले असतील, तर सतत हेअर स्पा केल्याने केसांचा रंग हळूहळू फिकट पडू लागतो. काही वेळा नैसर्गिक रंगसुद्धा मावळतो. याचे कारण म्हणजे स्पामध्ये वापरले जाणारे ब्लीचयुक्त प्रॉडक्ट्स, जे केसांच्या संरचनेवर परिणाम करतात.

४. कोरडेपणा आणि डॅंड्रफची शक्यता

स्पाच्या प्रक्रियेमुळे टाळूची नैसर्गिक तेल ग्रंथी कमी प्रमाणात कार्य करू लागतात. त्यामुळे टाळू कोरडी होते आणि डॅंड्रफ वाढू शकतो. वारंवार ही प्रक्रिया केल्यास केस मुळांपासून नाजूक आणि कमजोर होतात.

५. उपाय काय?

हेअर स्पा पूर्णतः वाईट नाही. योग्य पद्धतीने आणि गरजेनुसार केल्यास तो फायदेशीर ठरतो. पण दर महिन्याला केमिकल बेस्ड स्पा करणं टाळावं. नैसर्गिक तेलं, घरगुती उपाय आणि स्किन फ्रेंडली प्रॉडक्ट्स वापरणं केवळ सुरक्षितच नाही, तर टिकाऊही ठरतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी दुर्घटना! दिल्लीत रहिवासी इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 8 ते 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती मोठी दुर्घटना! दिल्लीत रहिवासी इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 8 ते 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
राजधानी दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर-पूर्व दिल्लीतील दयालपूर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या शक्ती विहार भागामध्ये शुक्रवारी मध्यरात्री रहिवासी इमारत कोसळली....
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड
कोण नामदेव ढसाळ? या कार्यक्रमाचे आयोजन
पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातोय! उद्धव ठाकरे यांचे परखड मत
हिंदी सक्ती बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
बीड पुन्हा हादरले; प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण