मच्छर नेमके कोणाला चावायचे याची निवड कशी करतात? काय आहे या मागचे शास्र ?
आता उन्हाळ्याचे दिवस असून डासांचा उपद्रव याकाळात सर्वाधिक असतो. तुम्ही ऐकले असेल की काही लोकांना मच्छर किंवा डास खुपच त्रास देतात. तर काही लोकांना कमी त्रास देत असतात. तुमच्या बाजूला बसलेल्या मित्राला डास चावत नाहीत आणि तुम्हाला मात्र डासांनी फोडून खाल्लेले असते. असे नेमके का होते. काही लोकांना डास जास्तच चावतात. तर काही लोकांना कमी असे का असते? या मागे विज्ञान आहे. काही रक्त गटाच्या लोकांना जादा मच्छर चावतात तर काही रक्त गटाच्या लोकांना कमी चावतात असेही बरेचदा असते. डासांच्या चावण्यामागे शरीराचा गंध, रक्तगट, तापमान नेमके काय असते? काहींना डास कमी तर काहींना जास्त चावण्यामागचे नेमके कारण काय असते ते पाहूयात….
कार्बनडाय ऑक्साईड आणि मच्छर
मच्छर माणसांना शोधण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची (CO2) मदत घेत असतात. म्हणजे आपण जो उच्छवास सोडतो त्याचा ते अदमास घेत असतात. ज्या लोकांच्या शरीरातून कार्बनडाय ऑक्साईड CO2 जादा निघतो त्यांना किंवा मोठे उंचीने अधिक असलेल्यांना मच्छर अधिक निशाणा बनवित असतात.
शरीराच्या तापमानाचा अदमास
सुमारे 5 ते 15 मीटर अंतरावरुन डासांना माणसे दिसत असतात. माणसांच्या जवळ पोहचल्यानंतर ते आपल्या दृष्टीचा वापर करत असतात. ते जेव्हा आपल्या शरीराच्या एकदम जवळ पोहचतात. तेव्हा ते शरीराच्या तापमानाचा अदमास घेतात. त्यावेळी ते एखाद्या व्यक्तीला चावायचे की नाही याचा निर्णय घेत असतात.
शरीरातून निघालेला गंध देखील मच्छरांना आकर्षित करतो
आपल्या शरीरातून निघालेले गंध देखील मच्छरांना अधिक आकर्षित करीत असतो. घामात असलेल्या लॅक्टीक एसिड, युरिक एसिड आणि अमोनिया सारख्या रसायन मच्छरांना आवतण देत असतात. प्रत्येक माणसाचा शरीराचा गंध वेगवेगळा असतो. जी जिन्स आणि बॅक्टेरियावर अवलंबून असते. त्यामुळे ज्याच्या शरीरातून अधिक वास येतो त्याला सर्वाधिक डासांचा उपद्रव होतो. त्यालाच डास जास्त चावत असतात.
या ब्लड ग्रुपच्या लोकांना सर्वाधिक चावतात मच्छर
तुम्हाला माहीती आहे का ? तुमचा रक्तगट देखील डास आणि मच्छरांना आकर्षित करीत असतो. अनेक संशोधनात हे स्पष्ट झाले की ‘O’ रक्त गटाच्या लोकांना मच्छर जास्त चावतात. तसेच ‘A’ रक्त गटाच्या लोकांना मात्र मच्छर कमी पसंत करतात. असे का ? तर मच्छर काही रक्त गटांत असलेल्या रासायनिक घटकांना आकर्षित होऊन त्या व्यक्तींना जास्त चावत असतात.
शरीराचे तापमान आणि घाम
मच्छर अधिक तापमान असलेल्या किंवा अधिक घाम येणाऱ्या व्यक्तींच्या शरीराकडे कायम आकर्षित होत असतात.मच्छरांना त्यांना चावणे आवडते. म्हणून उन्हाळ्यात व्यायाम केल्यानंतर मच्छर त्यांना अधिक चावत असतात.घामातून नघणारा ओलावा थंडावा आणि वास मच्छरांना जवळ बोलावतो. परंतू हे अजून सिद्ध झालेले नाही तुम्हाला नेमके याच कारणांसाठी मच्छर चावतील,परंतू हे एक मोठे कारण जरुर आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List