भाजपला धक्का! ईव्हीएमवर जिंकलेल्या भाजप आमदाराला बॅलोट पेपरवर निम्मी मतंही नाही
चार महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या. राज्यात महायुतीविरोधातील वातावरण असतानाही त्यांचे सरकार आले. हा लोकांनी दिलेला निकाल नसून ईव्हीएम मशीनमधून मिळवलेला निकाल असल्याची टीका विरोधकांनी केली. मात्र आता विरोधकांचा हा आरोप खरा ठरवणारा प्रकारच साताऱ्यात घडला आहे.
विरोधकांचा 21~0 असा दणदणीत धुव्वा उडवत सातारा जिल्ह्यातील ‘सह्याद्री’वर विजयाचा झेंडा डौलाने फडकवल्याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब आपलं मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या नेतृत्वाखाली हा कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करतच होता आणि पुढंही करेल, असा विश्वास आहे,… pic.twitter.com/19cNybMbH8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 7, 2025
कराडमधील सह्याद्रा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ळासाहेब पाटील यांच्या पॅनलला भरघोस यश मिळाले तर भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्त्वातील पी.डी. पाटील पॅनेलचे सर्व उमेदवार 7500 ते 8000 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.
रोहिणी खडसेंचा टोला
4 महिन्यांपूर्वी 50 हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार, बॅलेट पेपर वर घेतलेल्या ‘सहयाद्री कारखाना’ निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी लगावला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List