शिंदेंचे चिंधीचोर कोरटकर, सोलापूरकर, कोश्यारींच्या घरी आंदोलनं करतील का? आदित्य ठाकरे यांचा सवाल
ज्या प्रकारे शिंदेंच्या चिंधीचोरांनी काल कुणाल कामराच्या सेटवर आंदोलन केलं तसं आंदोलन हे चिंधीचोर कोरटकर, सोलापूरकर, कोश्यारींच्या घरी आंदोलनं करतील का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
या घटनेनंतर कुणाल कामरा यांनी संविधानाचे पुस्तक दाखवत फोटो शेअर केला. ” भाजपवाले बोलतात कुणाल कामराने लाल रंगाचे संविधान दाखवलं. या संविधानाचीच भिती भाजपला आहे. रंगाचे खेळ भाजपवाले करत असतात. हेच भाजपवाले शेतकऱ्यांना अर्बन नक्सल आणि माओवादी म्हणाले होते”, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
”अशीच परिस्थिती राहिली तर मुख्यमंत्र्यांची ही जबाबादारी आहे की त्यांनी त्यांचा धाक काय आहे ते दाखवून द्यावा किंवा मग अशी आंदोलनं झाली तर त्यावर कारवााई करणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगाव”, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
”मुख्यमंत्री राज्यात पर्यटन, गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करत असतील पण अशा घटना घडल्यानंतर कुणीही आपल्या राज्यात येणार नाहीत. हा कदाचित एक प्रयत्न असेल एकनाथ शिंदे यांचा की भाजपच्या नेतृत्वाला दाखवून द्यायचं की फडणवीस किती अकार्यक्षम आहेत हे दाखवून द्यायचं असेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List