मंगेशकर रुग्णालयानं पत्रकार परिषद गुंडाळली, डॉ. केळकर का गेले निघून? वाचा…

मंगेशकर रुग्णालयानं पत्रकार परिषद गुंडाळली, डॉ. केळकर का गेले निघून? वाचा…

दीनानाथ रूग्णालयातील प्रशासनाच्या मुजोरपणामुळे आणि पैशांच्या मागणीवर अडून बसल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला. याच संदर्भात आज पहिल्यांदाच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. मात्र यावेळी डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकारांच्या काही प्रश्नांना उत्तर न देताच पत्रकार परिषद गुंडाळली. वारंवार तेच प्रश्न विचारात असं म्हणत ते पत्रकार परिषदेतून निघून गेले. यावेळी पत्रकारांनी त्यांना उत्तर न देता जाणं योग्य नाही, असं वारंवार म्हटलं. मात्र ते थांबले नाही.

याआधी तनिषा भिसे प्रकरणी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना डॉ. धनंजय केळकर म्हणाले की, “आगोदर दीनानाथ रुणालयात डिपॉझिट घेत नव्हते. मात्र पुढे गुंतागुंतीचे आणि महागडे उपचार खूप वाढल्याने लोकही लांबून आमच्याकडे यायला लागले. त्यामुळे ज्या रुग्णांच्या उपचारासाठी जास्त पैसे लागणार होते, त्यासाठी अनामत रक्कम घेतली जाऊ लागली.” ते पुढे म्हणाले, “भिसे यांचा मला दुपारी 2 वाजेदरम्यान कॉल आला होता. तसेच मी भिसे यांना दोन ते अडीच लाख रुपये भरण्यास सांगितले होते. रुग्णालय प्रशासन माझा शब्द डावलणार नाही, असेही मी त्यांना सांगितले होते. पुढे काय झाले, याची मला कल्पना नाही”, असंही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भायखळ्यात रंगला होम मिनिस्टरचा खेळ, शिवसेनेच्या वतीने आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भायखळ्यात रंगला होम मिनिस्टरचा खेळ, शिवसेनेच्या वतीने आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेना भायखळा विधानसभा व कुलस्वामिनी उद्योगी स्त्री एकत्रीकरण व महिला विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी घोडपदेवच्या म्हाडा संकुलातील मैदानामध्ये...
ऑनलाईन कर्ज फेडणे पडलं भलतंच महागात
चीनच्या निर्णयामुळे ट्रम्प चौताळले; दिली नवी धमकी
IPL 2025 – हार्दिक-तिलकची वादळी खेळी व्यर्थ, RCB ने 10 वर्षांनी “वानखेडे” जिंकलं; मुंबईचा 12 धावांनी पराभव
महागाईने पिचलेल्या जनतेचे या दरवाढीने कंबरडे मोडणार आहे – सतेज पाटील
भक्तांनी लोकांचे खिसे कापणाऱ्या ‘या’ निर्णयाचे स्वागत करावं, अंबादास दानवे यांचा टोला
Nanded News – आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल, मुद्देमाल जप्त