कॉमेडियन कुणाल कामराचं गाणं मिंधे गटाला झोंबलं, सेटची केली तोडफोड

कॉमेडियन कुणाल कामराचं गाणं मिंधे गटाला झोंबलं, सेटची केली तोडफोड

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक गाणं गायल्याने मिंधे गटाला चांगलंच झोंबलं आहे. या गाण्याच्या बोलवरुन मिंधे गटाला इतका राग आला की त्यांनी थेट शोच्या सेटवर पोहोचत तोडफोड केली आहे. तसेच कॉमेडियन कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.

काय आहे गाणं?

आपल्या शोमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर विनोद करताना कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता गाणं गायलं की, “ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, आँख पर चष्मा, मेरी नजर से दोखो तो गद्दार नजर वो आये.” त्याच्या या गाण्याने मिंधे गटाला चांगलीच मिर्ची लागली आणि त्यांनी त्याच्या शोच्या सेटची तोडफोफ केली.

कुनाल की कमाल!

यावरच आपली प्रतिक्रिया देताना X वर एक पोस्ट शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, “कुणाल कामरा हा एक प्रसिद्ध लेखक आणि स्टँडअप कॉमेडियन आहे. कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणावर एक व्यंग्यात्मक गाणे लिहिले तर शिंदे टोळी चिडली. त्याच्या लोकांनी कामराचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला. देवेंद्रजी, तुम्ही एक कमजोर गृहमंत्री आहात!”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान दगडफेक, व्हिडीओ व्हायरल सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान दगडफेक, व्हिडीओ व्हायरल
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक सोनू निगम याच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. त्याचे गाणे ऐकण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी लहान...
राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, बी एच पालवे महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक
विहिरीच्या खोदकामादरम्यान भीषण अपघात, दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
वर्गात बडबड करत होती म्हणून पाचवीच्या विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, शिक्षिकेवर गुन्हा दाखल
खेड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली, कोकण रेल्वे ठप्प; दीड तासांनी वाहतूक सुरळीत
ईदी घेण्यासाठी उडाली झुंबड; अव्यवस्थेमुळे भाजप नेत्यांचा कार्यक्रमातून काढता पाय
पक्ष्याच्या धडकेमुळे इंडिगो विमानाचे उड्डाण रद्द, प्रवाशांचा विमानतळावर खोळंबा