कामाचं प्रेशर सहन होईना, सॉफ्टवेअर इंडिनिअरची इमारतीवरून उडी, केरळमध्ये खळबळ
ऑफिसमधल्या कामाचा ताण सहन न झाल्याने एका 23 सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगने इमारतीवरून उडी घेत जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. केरळमधील कोट्टायम येथे ही धक्कादायक घटना घडली. जेकब थॉमस असे मयत इंजिनिअरचे नाव असून आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आईला व्हिडिओ मॅसेज केला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
जेकब बा कक्कनड येथील एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. चार महिन्यांपूर्वीच जेकब नोकरीवर रुजू झाला होता. आपल्याला कामाचा ताण सहन होत नसल्याचं जेकबने अनेकदा आपल्या आई-वडिलांना सांगितलं होतं. अखेर शनिवारी पहाटे जेकबने आईला एक व्हिडिओ मॅसेज पाठवला. त्यात त्याने मला कामाचा ताण सहन होत नाही, रात्री झोपही येत नाही असे म्हटले आहे. यानंतर त्याने राहत्या इमारतीवरून उडी घेतली.
इमारतीवरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याने जेकबचा जागीच मृत्यू झाला. जेकबच्या रुममध्ये सुसाईड नोट सापडली असून त्यातही त्याने कामाचा ताण सहन होत नसल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी जेकबच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल करत कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List