सायबर भामट्यांना पोलिसांचा झटका, 24 तासांत एक कोटी 49 लाख जाण्यापासून रोखले
वेगवेगळय़ा क्लृप्त्या लढवून सायबर भामटय़ांनी नागरिकांना ऑनलाइन आर्थिक गंडा घातला होता. पण संबंधितांनी वेळीच सायबर पोलिसांच्या 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधल्याने सायबर गुन्हेगारांना मोठा झटका बसला. तक्रारी येताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तब्बल एक कोटी 49 लाख रुपये त्या आरोपींच्या खिशात जाण्यापासून रोखले. अवघ्या 24 तासात ही कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी सायबर पोलिसांच्या 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर इन्वेस्टमेंट फ्रॉड, शेअर ट्रेडिंग, समाज माध्यमातून ऑनलइन शॉपिंग फ्रॉड, व्हॉटसअपद्वारे बनावट प्रोफाईल तयार करून पैशांची मागणी करणे अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. यापैकी 110 तक्रारींची नोंद एमसीसीपीआरपी पोर्टलवर करण्यात आली होती. सायबर पोलिसांनी या तक्रारींची तत्काळ दखल घेत संबंधित बँक व अन्य नोडल अधिकाऱयांशी संपर्क साधून फसवणूक झालेली रक्कम बँक खात्यांवर गोठविण्यात आली. एक कोटी 49 लाख 87 हजार रुपये पोलिसांनी सायबर गुन्हेगारांकडे जाण्यापासून रोखले. यामुळे सायबर भामटय़ांना मोठा झटका बसला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List