वक्फ विधेयकावरुन उद्धव ठाकरेंची काँग्रेसपेक्षा वेगळी चूल, थेट म्हणाले ‘आम्ही जाणार…’
Waqf Bill: वक्फ संशोधन विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत समंत झाले. या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची सही झाली. त्यामुळे हा आता कायदा बनला आहे. या विधेयकास लोकसभेत आणि राज्य सभेत शिवसेना उबाठाने विरोध केला होता. आता काँग्रेससह काही जण वक्फ संशोधन विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. परंतु शिवसेना उबाठाने न्यायालयात जाण्यास स्पष्ट नकार दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेसला जायाचे असेल तर जाऊ द्या. आम्हाला जे सांगायचे होते ते मी सांगितले आहे. यापुढे जस-जशी वेळ येईल तेव्हा तेव्हा बोलत येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
‘ऑर्गनायजर’ मधील एका लेखात वक्फनंतर कॅथोलिक चर्च आणि त्यांच्या संस्थांकडे असणाऱ्या सात कोटी हेक्टर जमिनीकडे वेधले आहे. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, वक्फ बोर्डावर आम्ही आमची भूमिका मांडली आहे. या बिलाबाबत भाजपला हिंदूंचे काही घेणे देणे नाही. त्याचा छुपा अजेंडा ऑर्गनायजरने उघड केला आहे. भाजप ख्रिश्चिन समाजाकडे असणाऱ्या जमीन घेणार आहे.
भाजप जमिनी मित्रांना देणार?
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, भाजप वक्फ बोर्डाचा जमीनी घेणार आणि त्यांचा मित्रांना देणार आहे. त्यानंतर पुढची पायरी ख्रिश्चिन समाजाकडे असणाऱ्या जमिनी घेणार आहे. हळूहळू बौद्ध, शीख, जैन धर्मांकडे असणाऱ्या जमिनी सरकार घेणार आहे. मग हिंदू देवस्थांनाच्या जमिनीवरसुद्धा त्यांचा डोळा असणार आहे.
भाजप या सर्व मोक्याच्या जमिनी घेऊन त्यांच्या मित्रांना देतील. भाजपचे हे प्रेम समाजाबद्दल नाही. त्यांच्या मित्रांवर आहे. त्याला आमचा विरोध आहे. धर्माधर्मात भांडणे लावण्याचे काम भाजप करत आहे. धर्मांचे विष भाजप पेरत आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे, ती विष पेरणाऱ्यांना दूर ठेवले पाहिजे. लोकांना तणावग्रस्त आयुष्य जगायला लावत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानंतर रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले. पण मते मिळाल्यावर आता लोकांची फसवणूक केली. यामुळे या लोकांची रामाचे नाव घेण्याची पात्रता नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List