Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरण तापणार… राहुल कनाल यांची कामरासह चौघांविरोधात तक्रार, तिसरं नाव राष्ट्रीय नेत्याचं
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि वाद हे जुनं समीकरण असून आता त्याच्या एका व्हिडीओमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातलं वातावरण प्रचंड तापलं आहे. एका शोमध्ये कुणालने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत एक विडंम्बनात्मक गाण सांदर केलं, त्यामध्ये त्याने नाव न घेता अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्याचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि नवा वाद पेटला. त्याच्या या वनिधानामुळे शिवसैनिकांचं डोकं तापलं आणि त्यांनी काल रात्री कामराचा शो ज्या हॉटेलमध्ये होते, तेथे जाऊन तोडफोडही केली. राहुल कनाल यांच्यासह अनेक शिवसैनिकांचा त्यात समावेश होता.
आता त्याच राहुल कनाल यांनी कुणाल कामरा विरोधात मुंबईतील खार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये कुणाल कामरा याच्यासह आणि तिघांच्या नावाचाही समावेश असून त्यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं नावहबी आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे या दोघांचही नाव त्यामध्ये आहे. स्वघोषित विनोदी कलाकार श्री. कुणाल कामरा, तसेच श्री. संजय राऊत, श्री. राहुल गांधी, आणि श्री. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आहे. वरील सर्व व्यक्तींनी पूर्वनियोजित कट रचून व नियोजित पद्धतीने माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेचा अपमान करण्यासाठी एक संगठित प्रचार मोहीम राबवली आहे असे तक्रारीत राहुल कनाल यांनी म्हटलं आहे.
राहुल कनाल यांची पोलिसांत तक्रार
कुणाल कामरा यांनी सार्वजनिक भावनांना दुखावणारे विधान केले, अश्लील शब्दांचा वापर केला आणि श्री. एकनाथ शिंदे यांना उद्देशून अपमानकारक व बदनामीकारक सूचक विधाने केली. हे कृत्य कायदेशीरदृष्ट्या गुन्हेगारी स्वरूपाचे असून भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधींवर विधायक टीका करणे मान्य आहे, परंतु अशी जाणीवपूर्वक बदनामीकारक विधाने कायद्याच्या चौकटीबाहेर जातात आणि गुन्हेगारी स्वरूप धारण करतात. म्हणूनच मी आपणास विनंती करतो की, वरील आरोपींविरुद्ध तातडीने चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही त्यात नमूद करण्यात आलं आहे.
कुणाल कामरा, संजय राऊत, राहुल गांधींविरोधात तक्रार
राहुल कनाल यांनी या तक्रारीत चौघांची नावे दिली आहेत.
क्रमांक १: कुणाल कामरा, व्यवसाय: स्वघोषित विनोदी कलाकार
क्रमांक २: संजय राऊत, व्यवसाय: राजकारणी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सदस्य
क्रमांक ३: राहुल गांधी, व्यवसाय: राजकारणी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य
क्रमांक ४: आदित्य ठाकरे, व्यवसाय: राजकारणी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सदस्य
कुणाल कामराच्या स्टुडिओबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केल्याबद्दल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. त्यानंतर सध्या स्टुडिओबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काल रात्री शिवसेनेचे कार्यकर्ते येथे पोहोचताच त्यांनी प्रथम मुख्य दरवाजा तोडला. आणि त्यानंतर त्यांनी स्वागतकक्ष तोडला आणि नंतर समोर जे काही दिसले ते तोडले. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड केली आहे.
दुसरीकडे, स्टुडिओ आणि हॉटेलमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर सर्व शो बंद करण्यात आले आहेत. आणि स्टँड-अप कॉमेडियनच्या शोचे बाहेर लावलेले पोस्टर्स काढून टाकण्यात आले आहेत आणि स्टुडिओबद्दल लिहिलेली माहिती काळ्या रंगाने पुसून टाकण्यात आली आहे. तोडफोडीनंतर, कुणाल कामराच्या स्टुडिओबाहेर पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आणि शिवसेना नेते कुणाल सरमळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना धमकी दिली आहे की जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना मुंबईत फिरू दिले जाणार नाही. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामरा यांच्याविरुद्ध अंधेरीतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List