जेडीयू आणि टीडीपीमध्ये पक्षांतर्गत अस्वस्थता, वक्फ विधेयकाला पाठिंबा; नितीश समर्थकांचे राजीनामा सत्र सुरू

जेडीयू आणि टीडीपीमध्ये पक्षांतर्गत अस्वस्थता, वक्फ विधेयकाला पाठिंबा; नितीश समर्थकांचे राजीनामा सत्र सुरू

वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या मित्र पक्षांत आता खटके उडायला लागले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयू आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीमध्ये पक्षांतर्गत अस्वस्था  वाढताना दिसत आहे. नितीश समर्थकांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे.

बिहार व आंध्र प्रदेशमध्ये मोठय़ा संख्येने मुस्लिम समुदाय आहे. त्यामुळे संसदेत वक्फ विधेयकाचे समर्थन करण्याची भूमिका जेडीयू आणि टीडीपीच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.  बिहारमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून वक्फ विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय अंगलट येण्याची भीती पक्षातील काही नेत्यांना वाटत आहे. जेडीयू आमदार गुलाम गौस हे तर सुरुवातीपासूनच विधेयकाच्या विरोधात आहेत.

अल्पसंख्य सेलच्या पाचजणांनी नितीश यांची साथ सोडली

जेडीयू अल्पसंख्याक सेलचे राज्य सचिव मोहम्मद शाहनवाज मलिक, प्रदेश सरचिटणीस सई मोहम्मद, तबरेज सिद्दीकी अलिग, भोजपूरचे पक्षाचे सदस्य मोहम्मद दिलशान रैन आणि मोहम्मद कासिम अन्सारी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

टीडीपी नेते म्हणतात, नाइलाजास्तव पाठिंबा

नाइलाजास्तव वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्याचे काही टीडीपी नेत्यांचे म्हणणे आहे. कुठल्याही राज्यातील वक्फ बोर्ड या विधेयकावर खूश नसेल, कारण यातून त्यांचे अधिकार कमी होत आहेत. आमचाही विधेयकातील काही तरतुदींवर आक्षेप असल्याचे टीडीपीचे एक प्रमुख मुस्लिम नेते अब्दुल अजीझ यांनी म्हटले आहे.

जेडीयू सरचिटणीसांचा आंदोलनाचा इशारा

नितीशकुमार यांचे समर्थक आणि जेडीयू सरचिटणीस माजी खासदार गुलाम रसूल बलयावी यांनी मुस्लिम संघटनांनी संयुक्त संसदीय समितीला सुचवलेल्या सुधारणा दुर्लक्षित केल्याने नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. बिहारमध्ये या विधेयकाविरोधात एदारा-ए-शरीयाकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

CIDमधील ACP प्रद्युम्न यांचा प्रवास खरंच संपणार? शिवाजी साटम यांनीच सांगितलं सत्य… CIDमधील ACP प्रद्युम्न यांचा प्रवास खरंच संपणार? शिवाजी साटम यांनीच सांगितलं सत्य…
CID मालिकेला वेगळ्या परिचयाची गरज नाही. सुमारे 20 वर्षांपासून सुरू असलेला हा प्रसिद्ध हिट थ्रिलर शो प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग...
Manoj Kumar Death: रुद्राक्ष, साईबाबांची विभूती आणि…, मनोज कुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी रवीनाने आणल्या 3 गोष्टी
माणिकराव कोकाटे म्हणजे कृषिक्षेत्रातील कुणाल कामरा झालेत; रोज शेतकऱ्यांची खिल्ली उडवताहेत, संजय राऊत यांचा हल्लाबोल
मोदी ट्विटर PM, सोशल मिडिया हा त्यांचा वेगळा देश; ‘टॅरिफ वॉर’वरील मौनावरून संजय राऊत यांची घणाघाती टीका
सुंदर दिसण्यासाठी नाकाची केली सर्जरी, नंतर ओळख निर्माण करण्यासाठी नवऱ्यालाही सोडले…
टॅरिफ ही तर श्रीमंत होण्याची संधी, बदलांच्या काळात आर्थिक दुर्बल संपतील; शेअर बाजारातील घसरणीबाबत ट्रम्प यांचे धक्कादायक विधान
मुलांना सोशल मीडिया बंदी कोर्ट घालू शकत नाही, संसदेला कायदा करायला सांगा; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली