‘ठरलं तर मग’ मालिकेत ‘झिम्मा’ फेम अभिनेत्रीची एण्ट्री; साकारणार नामांकित वकील
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. साक्षी आणि महिपतची कारस्थानं उघड करण्याचा अर्जुन सर्वतोपरी प्रयत्न करतोय. मात्र अर्जुनचा न्याय मिळवण्यासाठीचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही.
अर्जुनच्या वाटेत आता महिपत आणखी एक अडसर आणणार आहे. साक्षीच्या बाजूने केस लढवण्यासाठी महिपतने हुकमी एक्का शोधून काढला आहे.
हा हुकमी एक्का म्हणजे नामांकित वकील दामिनी देशमुख. मालिकेच्या पुढील भागांमध्ये अर्जुन विरुद्ध दामिनी हा सामना कथानकाची उत्कंठा आणखी वाढवणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List