‘संपत्तीमध्ये आणखी किती हिस्से…’, आमिर खानचा नव्या गर्लेफ्रेंडसोबत ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
Aamir Khan Love Life: बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. आमिर खान याने स्वतःच्या वाढदिवशी नव्या प्रेमाची कबुली दिली. आमिर खान वयाच्या 60 व्या वर्षी गौरी स्प्रॅट हिला डेट करत आहे. आमिर खान आणि गौरी यांच्या वयाबद्दल सांगायचं झालं तर, गौरी हिचं वय 46 वर्ष आहे. तर आमिर खान 60 वर्षांचा आहे. दरम्यान, सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिल्यानंतर आमिर खान याला पहिल्यांदा गर्लफ्रेंडसोबत स्पॉट करण्यात आलं.
सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आमिर खान गौरी हिची काळजी घेताना दिसत आहे. दोघांना एक्सेल ऑफिसमध्ये स्पॉट करण्यात आलं. एक्सेल हे फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या मालकीचं प्रॉडक्शन हाऊस आहे. आमिर आणि गौरी ऑफिसमधून बाहेर पडून कारमध्ये बसलेले दिसले.
सांगायचं झालं तर, अनेकांना आमिर खान आणि गौरी यांची जोडी आवडली आहे, तर अनेकांनी सोशल मीडियावर आमिर याला ट्रोल केलं आहे. दोघांच्या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘लोकं स्वतःचं वय देखील पाहात नाहीत. वय झालंय पण वागणुकीत काही सुधारणा नाही…’
अन्य एक नेटकरी केमेंट करत म्हणाला, ‘काल याची लेक म्हणून रडत होता… संपत्तीमध्ये आणखी किती हिस्से होतील…’, ‘कल्पना करा सलमान खान याला देखील गौरी भेटली तर…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘आमिर आयुष्याचा आनंद घेत आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर – गौरीच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
तिसरा संसार थाटणार आमिर खान?
नव्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आमिर खान याला तिसरं लग्न करणार का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, ‘मी दोन वेळा लग्न केलं आहे. आता वयाच्या 60 व्या वर्षी लग्न करणं योग्य वाटणार नाही. पण तरी पाहू पुढे काय होईल…’ असं आमिर म्हणाला आहे.
कोण आहे गौरी स्प्रॅट?
आमिर खान याची नवीन गर्लफ्रेंड विवाहित असून तिचा घटस्फोट झाला आहे. रिपोर्टनुसार, गौरी हिला एक मुलगा देखील आहे. सध्या ती आपल्या मुलासह बेंगळुरूमध्ये राहते. गौरी एका प्रोडक्शन हाऊसमध्येही काम करते. अभिनेत्याने सांगितले होते की, तो गौरीला गेल्या 25 वर्षांपासून ओळखतो. पण त्यांच्या रिलेशनशिपला फक्त 1 वर्ष झालं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List