IPL 2025 – राजस्थान विजयी ट्रॅकवर परतणार? दमदार यष्टीरक्षकाचं होणार पुनरागमन
IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सला (RR) अद्याप सुर गवसलेला नाही. कर्णधार रियान परागच्या नेतृत्वात संघाची कामगिरी अगदीच सुमार राहिली आहे. राजस्थानने आतापर्यंत तीन सामने खेळले असून दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशातच संघासाठी आनंदाची बातमी समोर आली असून कर्णधार संजू सॅमसनच संघात पुनरागमन होणार आहे.
पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा 6 धावांनी पराभव केला. दोन गुणांसह राजस्थानचा संघ क्रमवारीत सध्या 9व्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वाच चांगलाच उंचावला असेल, अशातच कर्णधार संजू सॅमसनच देखील संघात पुनरागम होणार आहे. दुखापतीमुळे संजू सॅमसन पहिले तिन्ही सामने फक्त फलंदाजीसाठी मैदानात उतरत होता. कर्णधार म्हणून रियान पराग आणि यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेल जबाबदारी पार पाडत होते. परंतु आता संजू सॅमसन पूर्णवेळ सामना खेळताना दिसणार आहे. BCCI च्या सेंटर ऑफ एक्सलन्सने त्याला हिरवा झेंडा दाखवला असून 5 एप्रिल रोजी पंजाबविरुद्ध होणाऱ्या सामन्यात संजू कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आगामी काळात संजूच्या येण्याने संघाची कामगिरी सुधारते का, हे पाहण्यासाठी चाहते सुद्धा उत्सूक आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List