BSNL ने 1,757 कोटी रुपयांवर पाणी सोडलं? कॅगच्या अहवालातून मोठा घोळ उघड
भारत टेलिकॉम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BSNL) गेल्या 10 वर्षांपासून टॉवर्ससारख्या पायाभूत सुविधा शेअर करण्यासाठी रिलायन्स जिओकडून कोणतीही वसुली केलेली नाही, अशी माहिती नियंत्रक आणि महालेखा परीक्षकच्या (CAG) अहवालातून समोर आली. कॅगच्या अहवालानुसार, यामुळे केंद्र सरकारला सुमारे 1,757.56 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कॅगने आपल्या अहवालात असंही म्हटलं आहे की, सरकारी मालकीच्या बीएसएनएलला टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाईडर्सला (TIPs) दिलेल्या महसूल वाट्यातून परवाना शुल्काचा काही भाग वजा करण्यात अयशस्वी झाल्यामुळे 38.36 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कॅगने म्हटलं आहे की, बीएसएनएलने मेसर्स रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (आरजेआयएल) सोबतचा मास्टर सर्व्हिस करार लागू करण्यात अयशस्वी ठरले आणि बीएसएनएलच्या शेअर्ड टॉवर्ससारख्या पायाभूत सुविधांच्या अतिरिक्त वापरासाठी बिल दिले नाही. यामुळे मे 2014 ते मार्च 2024 दरम्यान सरकारी तिजोरीला 1,757.76 कोटी रुपयांचे नुकसान झाले. कॅगला असेही आढळून आले की, बीएसएनएलने इन्फ्रा शेअरिंग शुल्क कमी केले आहे. यामुळे जीएसटीचा 29 कोटी रुपयांचा महसूल बुडाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List