‘सैफच्या धर्माचा आदर कर’,करीना कपूरचा ईदचा लूक पाहून चाहते संतापले
31 मार्च 2025 रोजी सर्वत्र ईद साजरी केली गेली. यात सेलिब्रिटींचाही तेवढाच उत्साह पाहायला मिळाला. अनेक सेलिब्रिटींनी ईदच्यानिमित्ताने पार्टीही ठेवली होती. त्यात सलमान खानच्या पार्टीची चर्चा तर होतच आहे. पण सोबतच पतौडी घराण्याने ईद कशी साजरी केली हे जाणून घेण्यासाठीही नक्कीच चाहते उत्सुक होते. नवाब सैफ अली खानने कुटुंबीयांसोबत ईद साजरी केली. त्याचे फोटोही शेअर करण्यात आले.
ईदचे फोटो पाहून करीनाला मात्र प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे
पण आता ईदचे फोटो पाहून करीनाला मात्र प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. करीना कपूर तिच्या ग्लॅमरस शैलीसाठी देखील प्रसिद्ध आहे. कोणत्याही कार्यक्रमात ती तिची शाही लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. मग तो घरचा कॅज्युअल लूक असो किंवाआउटिंगचा सीन असो, करीना प्रत्येक वेळी तिच्या चाहत्यांना एक नवीन स्टाईल स्टेटमेंट देते. या करीनाचा लूक लोकांमध्ये एक ट्रेंड बनतो. पण यावेळी ईदच्या निमित्ताने करीनाने केलेल्या लूकमुळे नेटकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
करीनाला ईदच्या लूकमुळे का ट्रोल केले जात आहे?
सैफ अली खानच्या बहिणी सबा आणि सोहा यांनी ईद साजरी करतानाचे फोटो शेअर केले. यावेळी, ईदच्या निमित्ताने संपूर्ण पतौडी कुटुंब एकत्र दिसले. या फोटोंमध्ये, करीना कपूर वगळता सर्वजण ईदसाठी सजलेले दिसत होते. अशा परिस्थितीत, करीना कपूर खानला तिच्या ईदच्या लूकमुळे ट्रोल केले जात आहे.
केसं आणि कपडेही साधेच
एकीकडे, करीनाच्या दोन्ही ननंद सबा आणि सोहा, सूट आणि कानातले घालून, ईद साजरी करण्यासाठी त्यांच्या भावाच्या घरी पोहोचल्या, तर दुसरीकडे, करीनाने कोणतेही दागिने न घालता कॉटन प्रिंटेड सूट सेट परिधान केलेला दिसला. एवढेच नाही तर करीनाने कोणतेही स्टायलिंग न करताआपले केस घरात असल्याप्रमाणे बांधल्याचे दिसत आहे. जणू काही तिने केसांना तेल लावले आहे. यावेळी करीनाचा मेकअपशिवायचा लूकही पाहायला मिळाला.
“सैफच्या धर्माचा आदर कर”
पण ईदसाठी सैफच्या घरचे इतके छान पोषाखात आणि नटलेले, तयारीत दिसत असतानाच करीनाचा हा असा लूक पाहून सणानिमित्ताने छान आवरण्याची आवश्यकता का वाटली नाही असा प्रश्न विचारून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. करीनाचा हा लूक पाहून एका युजरने लिहिले की ‘करिनाला काय झाले आहे?’ तुम्ही ईदवर खुश नाही का? ‘तिने छान कपडे घालावेत’, दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की ‘ती चांगली दिसत नाहीये.’ तर अजून एकाने लिहिले आहे की, ‘असे दिसते की करीनाने ईदचे सर्व काम केले आहे’, तर एकानं म्हटलं आहे की, “सैफच्या धर्माचा आदर कर, जसा तो तुमच्या धर्माची पूजा करतो”. करीनाचा लूक पाहून अनेक चाहते तिला ट्रोल करताना दिसत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List