Sick Leave- सोशल मीडियावर गाजतोय #FakeSickLeave चा बिनडोक प्रकार; वाचा सविस्तर
सोशल मीडियावर कोण काय पोस्ट करेल याचं काहीच सांगता येत नाही. आॅफिसमध्ये रजा घेताना बाॅसला कसं फसवायचं याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या गाजत आहे. याच व्हायरल व्हिडीओमुळे सध्याच्या घडीला व्हिडीओ पोस्ट करणारी सोशल इन्फ्लुएन्सर वादात सापडली आहे. पुण्यातील एका मेकअप आर्टिस्टचा हा व्हिडिओ असून, रजा मिळवण्यासाठी अपघात होऊन बनावट जखमा यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत. या व्हिडिओमुळे इंटरनेटवर चांगलेच वातावरण तापलेले आहे.
काय आहे हा वाद?
मेकअप आर्टिस्ट प्रीतम जुजार कोठावाला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रॅन्क असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून, अपघात झाल्यानंतर रक्ताचे डाग आणि जखमा कशा असतील असा मेकअप केलेला व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. मुख्य म्हणजे या व्हिडीओवर “आयटी कंपनीतील व्यवस्थापकांनी हा व्हिडिओ पाहू नका असा सल्ला त्यांनी दिला होता. भरीस भर म्हणजे हे केवळ मनोरंजनासाठी आहे असे त्यांनी लिहीले होते. त्यामुळेच लोकांचा संताप त्यांच्यावर अधिक मोठ्या प्रमाणात उफाळून येत आहे. व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, “हा व्हिडिओ विशेषतः आयटीमध्ये काम करणाऱ्यांसाठी आहे. ज्यांना रजा मिळण्यास अडचण येते. त्यांनी हा व्हिडीओ बघून रजा मिळवू शकता.”
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मनोरंजनासाठी बनवलेल्या या व्हिडिओवर ऑनलाइन बरीच टीका होत आहे. अनेकांनी कामाच्या ठिकाणी अप्रामाणिकपणाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केलेला आहे. बऱ्याच जणांनी या व्हिडिओला बेजबाबदार म्हटले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “माफ करा, पण हे मजेदार नाही. हे खूप अनैतिक आहे.” दुसऱ्या एका युजरने, “हे मजेदार नाही. हे एक धोकादायक उदाहरण आहे”. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “कर्मचारी आणि मालकांमधील विश्वास कमी करण्याचा हा लज्जास्पद प्रयत्न आहे.” काही वापरकर्त्यांनी या ट्रेंडला “नैतिकतेतील घसरण” म्हटले, तर काहींनी तो फक्त एक विनोद समजून दुर्लक्ष केले. इंस्टाग्रामवर #FakeSickLeave ट्रेंड होत आहे, त्यावर अनेकजण विरोधात मत नोंदवताना दिसताहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List