या 5 स्टार किड्सचे करिअर सुपर फ्लॉप झालं; प्रेक्षकांनी नाकारले चित्रपट, आता हे कलाकार काय करतायत?
बॉलिवूडमध्ये घराणेशाहीबद्दल नेहमीच चर्चा होत राहिली आहे. पण या इंडस्ट्रीच्या सुरुवातीपासूनच अनेक स्टार्सच्या मुलांनी चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. अगदीच सुरुवातीच्या काळातील कलाकार म्हटंल तर, पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा राज कपूर हा देखील एक स्टारकिड होता. पण त्याची कारकीर्द बरीच यशस्वी झाली.
या स्टार किड्सचे करिअर फारसे यशस्वी होऊ शकले नाही
पण चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार किड्स आहेत ज्यांचे करिअर फारसे यशस्वी होऊ शकले नाही. त्यांच्यामध्ये काही स्टार किड्स होते ज्यांनी प्रामाणिकपणे हे स्वीकारलं आणि आयुष्यात पुढे गेले. पण काही जण अजूनही या क्षेत्रात संघर्ष करताना दिसत आहेत.
तुषार कपूर
बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूरनेही चित्रपटांमध्ये त्याचं नशीब आजमावलं. 2001 मध्ये ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटातून त्याने पदार्पण केले. काही रोमँटिक चित्रपट केल्यानंतर, त्याने विनोदातही हात आजमावला. पण अभिनेत्याची कारकीर्द काही खास राहिली नाही. तुषार पुढील चित्रपटामधून पुनरागमनाची तयारी करत आहे.त्याचा बॉलिवूडमधील संघर्ष अद्यापही सुरुच आहे. गोलमाल हा चित्रपट वगळता इतर चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून फारसी पसंती मिळाली नाही.
उदय चोप्रा
त्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मुलगा उदय चोप्रा याने आपल्या करिअरची सुरुवात मोहब्बतें या चित्रपटातून केली. या अभिनेत्याने अनेक चित्रपट केले. पण ते अपयशी ठरले. अखेर त्याने स्वतः कबूल केलं की अभिनेता म्हणून त्याची कारकीर्द काही खास नव्हती. त्याने स्वत:च या क्षेत्रातून माघार घेतली.
नील नितीन मुकेश
प्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू नील नितीन मुकेश याने देखील अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख आणि सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. हा अभिनेता अजूनही बॉलिवूडमध्ये संघर्ष करत आहे पण त्याच्या चित्रपटांना अद्यापही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये.
कुमार गौरव
राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव यानेही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने 90 च्या दशकात ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून पदार्पण केलं. हा चित्रपट लोकांना खूप आवडला. पण यानंतर अभिनेत्याची कारकीर्द फारशी खास राहिली नाही.
तनिषा मुखर्जी
दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची धाकटी मुलगी आणि काजोलची बहीण लहान बहिण तनिषा मुखर्जीचेही बॉलिवूडमध्ये फारस काही चाललं नाही. चित्रपट आणि ग्लॅमर जगात तिनेही आपलं नशीब आजमावला. तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात एका हॉरर चित्रपटाने केली. मात्र हा चित्रपट फार काही चालला नाही. या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत फक्त 10 ते 12 चित्रपट केले आहेत. मात्र त्यांना म्हणावी तशी प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List