होळीत नको तिथे रंग लावल्यामुळे चर्चेत आलेली आमिर अलीची गर्लफ्रेंड कोण? जाणून घ्या
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आमिर अली सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिरच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एण्ट्री झाली आहे. रंगपंचमीच्या पार्टीत त्याला एका मिस्ट्री गर्लसोबत पाहिलं गेलं. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच आमिरच्या मिस्ट्री गर्लबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आमिरने याआधी अभिनेत्री संजिदा शेखशी लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे. मात्र लग्नाच्या नऊ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आमिरला पहिल्यांदाच त्याच्या नव्या गर्लफ्रेंडसोबत पाहिलं गेलं.
आमिर अली जिच्या प्रेमात आहे, तिचं नाव अंकिता कुकरेती असल्याचं समजतंय. अंकितासुद्धा टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित असून तिने अभिनेता हृतिक रोशनसोबत एका जाहिरातीमध्येही काम केलं होतं. याशिवाय तिने विवेक ओबेरॉय आणि सोनू सूद यांच्यासोबतही स्क्रीन शेअर केला आहे. अंकिता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिथे विविध फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अंकिता काही म्युझिक व्हिडीओंमध्येही झळकली आहे. अंकिता अभिनेत्री आणि मॉडेलसोबतच राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलपटूसुद्धा आहे. अंकिता ही मूळची दिल्लीची आहे, मात्र कामानिमित्त ती गेल्या काही वर्षांपासून मुंबईतच राहतेय. अंकिता खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. इन्स्टाग्रामवर तिचे अनेक बोल्ड फोटोही पहायला मिळतात. इन्स्टाग्रामवर तिचे 294K फॉलोअर्स आहेत.
संजिदा आणि आमिरने 2021 मध्ये घटस्फोट घेतला. या घटस्फोटाविषयी तिने एका मुलाखतीत सांगितलं, “माझ्यासोबत जे काही घडलं त्यातून मला बाहेर पडता आलं यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते. त्यावेळी मला असं वाटलं होतं की मीच सर्वांत नैराश्यग्रस्त व्यक्ती आहे किंवा मीच फार दु:खी आहे. माझ्यासोबत हे सर्व काय घडतंय? माझ्या आयुष्यासोबत हे काय झालं? पण त्या सर्व गोष्टींमधून बाहेर पडता आल्याने आणि स्वत:वर पुन्हा प्रेम करता आल्याने मी नशिबवान समजते. असे काही पुरुष असतात, असे काही पार्टनर्स असतात जे तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काहीच करू शकत नाही, असं ते तुम्हाला सांगतात किंवा ते म्हणतात की तुम्ही एखादी गोष्ट करू शकणार नाही. अशा लोकांपासून दूरच राहिलेलं चांगलं असतं.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List