सायकलिंग करताना या गोष्टी न विसरता लक्षात ठेवा; तुम्हाला मिळतील अधिक फायदे
सध्याच्या काळात केवळ बसून राहण्यापेक्षा व्यायाम करण्याकडे अनेकजण वळत आहेत. मग सकाळी वाॅकला जाणे असो, जिममध्ये जाऊन घाम गाळणे असो. व्यायामाकडे सकारात्मक दृष्टीकोनाने बघणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढू लागलेली आहे. यालाच अनुसरून सायकलिंग करणारेही आपल्याला आता वाढताना दिसत आहेत. म्हणूनच अलिकडच्या काळात सायकल घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. सध्याच्या काळात जिममध्ये जाण्यापेक्षा अनेकजणांची सायकलिंगला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. सायकलिंग करणे हे फिटनेसच्या दृष्टीने अतिशय उत्तम पर्याय मानला जातो. म्हणूनच सायकल घेणाऱ्यांच्या संख्येत तुलनेने बरीच वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे.
सायकल चालवताना लक्षात ठेवायच्या टिप्स
सायकल चालवण्यापूर्वी सर्वात आधी ध्येय ठरवावे. ध्येय निश्चित केल्याने तुम्हाला लक्ष केंद्रित आणि उत्साही राहण्यास मदत होईल. पण लक्षात ठेवा, सुरुवातीला लहान ध्येये ठेवा. पहिल्याच दिवशी तुम्ही स्वतःला 10 किलोमीटर सायकल चालवण्याचे लक्ष्य ठेवू नका. असे केल्याने तुम्ही निराश व्हाल. त्याऐवजी, दररोज थोडे अंतर वाढवून मोठे ध्येय गाठा.
18 ते 64 वयोगटातील प्रौढांनी तंदुरुस्त राहण्यासाठी आठवड्यातून 2 ते 2.5 तास मध्यम स्वरुपाचा योग्य व्यायाम डाॅक्टरांच्या सल्ल्याने करावा. पण तुम्ही सायकल चालवत असाल तर तुम्ही ते दररोज किमान 30 ते 45 मिनिटे सायकलिंग करावे.
तुमचे ध्येय तंदुरुस्त राहणे असेल तर आठवड्यातून किमान तीन वेळा सायकलिंग नक्कीच करा. कालांतराने, सायकलिंग अंतर आणि सायकलिंगचा वेळ देखील वाढवता किंवा कमी करता येतो.
तुम्ही सायकल चालवायला सुरुवात करता तेव्हा, जसजसे अंतर वाढत जाते तसतसे पाय जड वाटू लागतात. म्हणून सरळ रस्त्यांवर सायकल चालवणे हे कधीही उत्तम. यामुळे लवकर थकवा जाणवणार नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List