Mahatma Gandhi- महात्मा गांधींच्या पणती नीलमबेन पारीख यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन
महात्मा गांधींच्या पणती नीलमबेन पारीख यांचे वयाच्या 93 व्या वर्षी नवसारी येथे निधन झाले. गांधीवादी विचारसरणीच्या अनुयायी असलेल्या, नीलमबेन यांनी महिला आणि मानवी कल्याणात मोलाचे योगदान दिले होते. नीलमबेन पारीख यांचे मंगळवारी निधन झाले असून, बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नीलमबेन या त्यांच्या मुलासोबत म्हणजेच डॉ. समीर पारीख यांच्यासोबत नवसारी येथे राहत होत्या. नीलमबेन यांनी गांधीवादी आदर्श आणि कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले होते.
महात्मा गांधींच्या पणती नीलमबेन पारीख या, महात्मा गांधींचे पुत्र हरिदास गांधी यांच्या नात होत्या. त्यांची अंत्ययात्रा सकाळी त्यांच्या निवासस्थानावरून काढण्यात आली. त्यांच्यावर वीरवाल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नीलंबेन गांधीवादी विचारसरणीवर विश्वास ठेवत होत्या, त्यांनी आपले जीवन सत्याला समर्पित केले होते. तसेच त्यांनी आयुष्यभर महिला कल्याण आणि मानवी कल्याणासाठी मोलाचे योगदान दिले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List