दारूची माहिती लपवल्यास विमा कंपन्या दावा फेटाळू शकतात
विमा पॉलिसी खरेदी करताना जर पॉलिसीधारकाने दारू पित असल्याची माहिती लपवली असल्यास विमा कंपन्या त्या व्यक्तीचा आरोग्य विमा नाकारू शकतात, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. हरयाणातील एका व्यक्तीने 2013 मध्ये विमा कंपनीची ‘जीवन आरोग्य पॉलिसी’ खरेदी केली होती, परंतु विमा पॉलिसीचा अर्ज भरताना आपल्याला दारूचे व्यसन आहे, अशी माहिती अर्जात भरली नाही. वर्षभरानंतर पॉलिसी खरेदी करणाऱया व्यक्तीला पोटात दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये एक महिना उपचार केल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि यात त्या व्यक्तीचे निधन झाले. मृत व्यक्तीच्या पत्नीने विमा पॉलिसीअंतर्गत विमा कंपनीकडे पैशांसाठी दावा केला, परंतु विमा कंपनीने तो फेटाळून लावला. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर पॉलिसीधारकाने दारूची माहिती विमा कंपनीला सांगितले नाही. मृत व्यक्तीला दारूचे व्यसन होते आणि त्याने पॉलिसी घेताना माहिती लपवली होती, असे विमा कंपनीचे म्हणणे आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List