वसई-दिवा रेल्वे वाहतूक आज आठ तास बंद, मेट्रोचे गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक

वसई-दिवा रेल्वे वाहतूक आज आठ तास बंद, मेट्रोचे गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक

ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो प्रकल्प पाच अंतर्गत सुरू असलेल्या ठाणे ते भिवंडी मार्गावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे उद्या बुधवारी वसई-दिवा रेल्वे वाहतूक आठ तास बंद ठेवली जाणार आहे. अंजूरफाटा येथील वसई-दिवा रेल्वे मार्गावरील पुलाच्या वरून मेट्रो लाईनचे गर्डर टाकले जाणार असल्याने रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ठाणे-भिवंडी या मार्गावर अंजूर फाटाच्या पुढे भिवंडीत येण्यासाठी सर्वच वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.

पर्यायी मार्ग वाहतूक विभागाने सुचवले असून मानकोली-अंजूर फाटा-खारबाव मार्गे अहमदाबाद महामार्गाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना घोडबंदर रोड मार्गे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध असणार आहे. नवी मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांना गैमन जंक्शन कळवा येथे प्रवेश बंदी असून गैमन जंक्शन कळवा येथून खारेगाव टोल नाकावरून घोडबंदर रोड मार्गे गुजरातकडे वाहने जातील. माजिवडा, मानकोली मार्गे गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांना माजिवडा वाय जंक्शन येथे प्रवेश बंदी असून पर्याय म्हणून माजिवाडा वाय जंक्शन येथून घोडबंदर रोडने गुजरातकडे जाण्यासाठी पर्याय सुचवला आहे.

गुजरातकडून चिंचोटी नाका मार्गे अंजूर फाटा मार्गे येणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंदी असून त्यांच्यासाठी चिंचोटी नाका, गायमुख फाऊंटन हॉटेल मार्गे घोडबंदर रोडने माजिवडा जंक्शनने पुढे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध असेल अशी माहिती नारपोली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Uddhav Thackeray : ट्रम्प टॅरिफवरुन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला घेरले, भारत केवळ पाकिस्तानला… Uddhav Thackeray : ट्रम्प टॅरिफवरुन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला घेरले, भारत केवळ पाकिस्तानला…
UddhavThackeray On Trump Reciprocal Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 27 टक्के टॅरिफ लावले. त्यावरुन आता देशात वेगवगेळ्या प्रतिक्रिया...
सावधान! कबुतर, कुत्री, मांजर यांना खाऊ घालणाऱ्यांनी ही बातमी नक्की वाचा
इंटिमेट सीन करताना अभिनेत्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; केलं हे घाणेरडे कृत्य, अभिनेत्रीचा खुलासा
‘सिकंदर’चं प्रमोशन न करणाऱ्या सेलिब्रिटींवर सलमान नाराज; म्हणाला “त्यांना वाटतं की मला..”
कुमार संगकारासोबत मलायकाच्या डेटिंगच्या चर्चा; अभिनेत्री म्हणाली “याआधी मी अशी..”
Crime News – लग्नासाठी वर्षभर थांब सांगितल्याने प्रियकर चिडला, प्रेयसीसह आईला भोसकलं
लिंगबदल करून सरिता झाली शरद अन् सविताशी लग्न केलं; आता घरात पाळणा हलला, फोटो व्हायरल