Korean Food- बघुनच खावसं वाटतंय! हिंदुस्थानला कोरियन फूडचं वेड

Korean Food- बघुनच खावसं वाटतंय! हिंदुस्थानला कोरियन फूडचं वेड

>> प्रभा कुडके

जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मानवाने फार पूर्वीपासून अनेक प्रकारे आणि पद्धतीने क्रांतीचा मार्ग अवलंबला. सध्या तर आपण एका अशा युगात आहोत, जिथे कुठलीही क्रांती न करता एका क्लिकवर पदार्थ आपल्या दारात येतोय. चवीला सीमांचे कधीच बंधन नसते. म्हणूनच आपण घरबसल्या परदेशातील चवींचा आस्वाद अगदी सहजसुलभ घेऊ शकतो. याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे पिज्जा. पिज्जा हा आपल्या हिंदुस्थानचा नाही, परंतु आपण त्याला गेली कित्येक वर्षे अगदी सहजपणे आपलंसं केलं आहे. पिज्जा आणि चायनीज आपल्या देशात या दोन्ही खाद्यसंस्कृती हातात हात घालून आल्या. आजच्या घडीला चायनीज हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून कोरियन सौंदर्याने देशातील महिलांना प्रचंड भूरळ घातली. कोरियन नाट्य, संगीत याच्याच जोडीला कोरियन अन्नपदार्थांनीही आपल्या आयुष्यात अगदी सहजपणे प्रवेश केला.

जिभेचे चोचले पुरवतांना आपण कधी कोरियन फूडच्या आहारी गेलो हे आपल्याला कळले देखील नाही. याचं अगदी बोलकं उदाहरण म्हणजे, सध्याच्या घडीला आपल्या देशामध्ये जवळपास 550 च्या वर कोरियन रेस्टाॅरण्ट्स अनेकांच्या चवीचे चोचले पुरवत आहेत. कोरियन फूड हे केवळ मेट्रो शहरांपुरते मर्यादीत राहिले नाही तर अगदी निमशहरी भागांनाही कोरियन फूडची चटक लागली आहे.

लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अलीकडे प्रत्येकाला कोरियन फूडचं वेड लागलेलं आहे. यामध्ये किमची, रॅमन, किमबॅप, फ्रोझन बाॅटल या आणि अशा कित्येक पदार्थांनी आपल्या जीवनशैलीमध्ये अगदी अलगदपणे प्रवेश मिळवला आहे. कोरियन अन्नपदार्थ हे प्रामुख्याने भात, नूडल्स आणि खूप साऱ्या भाज्यांनी बनवलेले असतात. या अन्नपदार्थांचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये घालण्यात येणारे साॅसेस हेच आहे.

कोरिय़न अन्नपदार्थांच्या वाढत्या क्रेझबद्दल ‘सामना’ सोबत बोलताना, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर म्हणाले, ”हिंदुस्थानच्या खाद्यसंस्कृतीमध्ये एकूण साडेबावीस हजार पदार्थ आहेत. याव्यतिरिक्त आपण परदेशी खाद्यपदार्थही तितक्याच चवीने खातो आणि त्यांना आपल्या दैनंदिन जीवनात स्थान देतो. कोरियन अन्नपदार्थ आपल्याकडे प्रसिद्ध होण्यास कारण म्हणजे त्यांची चव. भारतीयांना ज्या पद्धतीच्या मसाल्यांची आवड आहे त्या पद्धतीपेक्षा अगदी थोड्या फार फरकाने आंबट-गोड साॅस हेच या अन्नपदार्थांचे वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे कोरियन पदार्थ प्रसिद्ध झाले ते सोशल माध्यमांमुळे. सध्याच्या घडीला रिल्स आणि शाॅर्टस् मध्ये केवळ कोरियन अन्नपदार्थांची लज्जत आपल्याला घरबसल्या अनुभवायला मिळत आहे.”

कोरियन अन्नपदार्थांच्या वाढत्या मागणीला कोरियन पदार्थांचे सादरीकरण हाही एक घटक कारणीभूत आहे. कोरियन फूड सादरीकरणाची पद्धत ही अतिशय दिमाखदार आणि सुंदर असल्यामुळेही कोरियन अन्नपदार्थ कुटूंबातील प्रत्येक सदस्याच्या आवडीचे बनलेले आहेत. त्यामुळेच सध्याच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये कोरियन सौंदर्य तर चर्चेत आहेच पण त्याच जोडीला हिंदुस्थानतील जनता कोरियन अन्नपदार्थांच्याही प्रेमात आहेत असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Uddhav Thackeray : ट्रम्प टॅरिफवरुन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला घेरले, भारत केवळ पाकिस्तानला… Uddhav Thackeray : ट्रम्प टॅरिफवरुन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला घेरले, भारत केवळ पाकिस्तानला…
UddhavThackeray On Trump Reciprocal Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 27 टक्के टॅरिफ लावले. त्यावरुन आता देशात वेगवगेळ्या प्रतिक्रिया...
सावधान! कबुतर, कुत्री, मांजर यांना खाऊ घालणाऱ्यांनी ही बातमी नक्की वाचा
इंटिमेट सीन करताना अभिनेत्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; केलं हे घाणेरडे कृत्य, अभिनेत्रीचा खुलासा
‘सिकंदर’चं प्रमोशन न करणाऱ्या सेलिब्रिटींवर सलमान नाराज; म्हणाला “त्यांना वाटतं की मला..”
कुमार संगकारासोबत मलायकाच्या डेटिंगच्या चर्चा; अभिनेत्री म्हणाली “याआधी मी अशी..”
Crime News – लग्नासाठी वर्षभर थांब सांगितल्याने प्रियकर चिडला, प्रेयसीसह आईला भोसकलं
लिंगबदल करून सरिता झाली शरद अन् सविताशी लग्न केलं; आता घरात पाळणा हलला, फोटो व्हायरल