साक्षी तन्वरचे ‘या’ अभिनेत्यासोबत ‘प्रेमसंबंध’, तरीही लग्नाआधी झाली आई, वयाच्या 50 व्या अभिनेत्री का अविवाहित?
झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नाआधी आई होण्याचा निर्णय घेतला. आज वयाच्या पन्नाशीत देखील अभिनेत्री त्यांच्या मुलांसोबत एकट्याच जगत आहेत. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री साक्षी तन्वर… साक्षी तन्वर हिला आज कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत साक्षीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.साक्षी वयाच्या 50 व्या वर्षी देखील अविवाहित आहे.
साक्षीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी एक सेल्स ट्रेनी म्हणून काम करत होती. त्यानंतर साक्षीने ‘दूरदर्शन’ वरील ‘अलवेला सुर मेला’ साठी ऑडिशन दिलं. त्यामध्ये प्रेजेंटर म्हणून साक्षीची निवड झाली. त्यानंतर साक्षी ‘दस्तूर’ मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आली. त्यानंतर ‘कहानी घर घर की’ मालिकेतून साक्षीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत वाढ झाली.
पण एक काळ असा देखील आला जेव्हा साक्षी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. रिपोर्टनुसार, साक्षीने अभिनेता समीर कोचर याला डेट केलं आहे. पण दोघांपैकी एकाने देखील नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही.
अनेक सेलिब्रिटींसोबत साक्षीच्या नावाची चर्चा रंगली. पण कोणत्याच अभिनेत्यासोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्री आई होण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या 45 व्या वर्षी एका मुलीला दत्तक घेतलं. आज साक्षी दत्तक घेतलेल्या मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
दरम्यान, एका मुलाखतीत साक्षीला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मला लग्न करायला काहीही हरकत नाही. पण मला असा मुलगा कधी भेटलाच नाही. ज्याच्यासोबत मी लग्न करु शकेल आणि पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत जगू शकेल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.
साक्षी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने फक्त मालिकांमध्येच नाही तर, सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. साक्षी ‘दंगल’ सिनेमातील साक्षीच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. साक्षीच्या मुलीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीला अनेकदा मुलीसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List