हार्दिक पांड्याला नवीन प्रेम सापडल्याने नताशा अस्वस्थ? प्रेम,विश्वासावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत
आजकाल हार्दिक पांड्याचे नाव जास्मिन वालियाशी जोडलं जात आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, हार्दिकची कथित प्रेयसी जास्मिन वालिया दुबई स्टेडियमवर सामना पाहताना दिसली. यानंतर मात्र अनेक चर्चा रंगल्या. अनेकांनी कमेंट्स केल्या.पण आता याबद्दलची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ही पोस्ट म्हणजे त्याची एक्स पत्नी नताशा.
एक्स पत्नी नताशापासून घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक आणि ती आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. पण असं असतानाही सध्या नताशाची एक नवीन पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये ती प्रेम आणि विश्वासाबद्दल बोलताना दिसत आहे. तिच्या या गूढ पोस्टमुळे चाहत्यांची मात्र चिंता वाढली आहे.
नताशाची इंस्टाग्रामवरील पोस्ट व्हायरल
नताशा स्टेनकोविकने इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा फोटो शेअर केला आणि लिहिले आहे, ‘तुमच्या मनात किंवा एखाद्या व्यक्तीच्या रूपात असलेल्या शैतानाला तुमच्याशी खोटं बोलू देऊ नका. त्याला तुमच्या क्षमतेवर आणि मूल्यावर प्रश्न उपस्थित करू देऊ नका. तुम्ही एक अद्भुत व्यक्ती आहात ज्याला देवाने एका उद्देशाने या जगात पाठवले आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जाणून घ्या की देव तुमच्यावर प्रेम करतो. देव तुम्हाला कधीही सोडणार नाही. प्रेम आणि आशेबद्दल बोलायला विसरू नका. शैतान तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही. तुमचा दिवस चांगला जावो.”
नताशाने अचानक केलेल्या या पोस्टनंतर मात्र चाहत्यांना अंदाज बांधणं कठीण झालं आहे. नक्की नताशाला या पोस्टमधून काय सांगायचं आहे ते. त्यामुळे तिच्या या पोस्टवर अनेकांच्या कमेंट्स येत आहे. चाहत्यांनी चिंता व्यक्त करत तिला काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे.

गेल्या वर्षी हे जोडपे वेगळे झाले होते.
नताशाने हार्दिक पंड्यापासून वेगळा होण्याचा निर्णय घेतल्यानंतर जवळजवळ एक वर्षानंतर त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली. हार्दिक पांड्या आणि नताशा यांचं लग्न 2020 मध्ये झालं होतं ज्यामध्ये फक्त त्यांच्या कुटुंबाचेच सदस्य होते. यानंतर, फेब्रुवारी 2023 मध्ये या जोडप्याने पुन्हा हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं, परंतु गेल्या वर्षी या जोडप्याचा घटस्फोट झाला.
नताशा तिच्या मुलासोबत सर्बियाला गेली होती
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नताशा हार्दिक पंड्यापासून वेगळी झाल्यानंतरच्या तिच्या आयुष्याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांच्या मुलामुळे ती अजूनही पांड्यासोबत ‘कुटुंबा’ सारखी आहे. ती म्हणाली होती की, ‘आम्ही (हार्दिक आणि मी) अजूनही एक कुटुंब आहोत. आम्हाला एक मूल आहे आणि ते मूल आम्हाला नेहमीच एक कुटुंब म्हणून जोडून ठेवेल. अगस्त्यला दोन्ही पालकांसोबत राहायचं आहे. मी 10 वर्षांपासून भारतात आहे आणि दरवर्षी एकाच वेळी मी सर्बियाला परत जाते” असं म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List