75 वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची अजब मागणी, नकार देत म्हणाली, ‘मी पूर्ण थंड पडली कारण…’
Farida Jalal: ‘हीरामंडी- द डायमंड बाजार’ या मल्टीस्टारर सीरिजमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइरालास फरदीन खान, संजीदा शेख आणि शरमिन सहगल यांसारख्या अभिनेत्रींनी दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. दिग्गज अभिनेत्री फरीदा जलाल यांनी देखील सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारली आहे. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत फरीदा जलाल यांनी सीरिजमधील स्वतःच्या भूमिकेबद्दल मोठा खुलासा केला आहे. फरीदा जलाल यांनी ‘हिरामंडी’मध्ये ताहा शाह बदुशाची म्हणजेच ताजदारची आई कुर्सिया बेगमची भूमिका साकारली होती. वयाच्या 75 व्या वर्षीही अभिनेत्रीने आपल्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली.
आता नुकताच झालेल्या मुलाखतीत फरीदा यांनी दिग्दर्शकाने केलेल्या एका मागणीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘संजय लिला भन्साळी यांनी मला सांगितलं की पहिला शॉट आहे. तुम्ही महिला नवाबजाद्यांच्या ग्रूपसोबत बसला आहात, तुमची पार्टी सुरु आहे. तुमचा मुलगा नुकताच परदेशातून परत येतो आणि तुम्ही एका हातात दारुचा ग्लास आणि दुसऱ्या हातात सिगरेट घेवून बसले आहात… हे सर्व ऐकताच मी सुन्न झाली. माझे हात पाय थंड पडले…’
पुढे फरिदा म्हणाल्या, ‘मी दिग्दर्शकांना यासाठी स्पष्ट नकार दिला. माझ्या आयुष्यात अशा अनेक संधी आल्या जेव्हा अशा वाईट भूमिका माझ्या समोर आल्या आणि कायम या भूमिकांना नकार दिला. त्या भूमिकांमध्ये मी कधी स्वतःला पाहिलंच नाही.’
‘मी भंन्साळी यांना नकार दिला आणि त्यांनी देखील माझा नकार स्वीकार केला. त्यानंतर ते एका शब्दाने मला काही बोलले नाही. भन्साळी अत्यंत चांगले व्यक्ती आहेत.मी स्वतःला जेव्हा स्क्रिनवर पाहिलं तेव्हा मी प्रचंड आनंदी झाले. जर हातात दारूचा ग्लास आणि सिगरेट असती तर हीरामंडीमध्ये राहणाऱ्या इतर पात्रांमध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक दिसला नसता… असं देखील फरिदा म्हणाल्या.
‘हीरामंडी’ सीरिजबद्दल सांगायचं झालं तर, हिरामंडी हा पाकिस्तानमधील लाहोर स्थित रेडलाइट एरिया आहे. एकेकाळी तो ‘शाही मोहल्ला’ म्हणून ओळखला जायचा. देशाच्या विभाजनापूर्वी ‘हिरामंडी’च्या वेश्या त्याकाळी प्रचंड चर्चेत होत्या. राजकारण, प्रेम आणि फसवणूक या सर्व गोष्टी त्याकाळी कोठ्यावर पहायला मिळायच्या. त्यामुळे या सीरिजची कथा प्रेक्षकांसाठी फार रंजक ठरली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List