फिनलँड जगातील सर्वात आनंदी देश, हिंदुस्थान 126 व्या स्थानी
जगभरात दरवर्षी 20 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने गुरुवारी ‘वर्ल्ड हॅपीनेस’चा अहवाल जाहीर झाला असून जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत फिनलँडने पुन्हा एकदा अव्वल क्रमांक पटकावला आहे. या यादीत हिंदुस्थान देश नेपाळ आणि पाकिस्तानपेक्षा मागे असून 126 व्या स्थानावर आहे. फिनलँडने सलग आठव्यांदा पहिला क्रमांक मिळवला. 1970 च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच भूतानने आनंद दिन साजरा करण्याची सुरुवात केली होती. जुलै 2012 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 20 मार्च हा आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून साजरा केला जावा असा ठराव मंजूर झाला. फिनलंडनंतर डेन्मार्क, आइसलँड आणि स्वीडन या राष्ट्रांचा आनंदी देशांच्या यादीत क्रमांक येतो. देशातील दरडोई उत्पन्न, सामाजिक आधार, निरोगी जीवन, स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचार अशा काही घटकांचा विचार करून आनंदी देशाचा क्रम ठरवला जातो.
आनंदी देशांच्या यादीत 147 व्या क्रमांकासह अफगाणिस्तान सर्वात तळाशी आहे. हिंदुस्थानचे स्थान कायम असून गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही 126 वा क्रमांक आहे. या यादीत नेपाळ आणि पाकिस्तान हे आशियाई देश हिंदुस्थानपेक्षा पुढे आहेत. हे दोन्ही देश आनंदी देशांच्या यादीत अनुक्रमे 93 आणि 109 व्या स्थानावर आहेत. महासत्ता असलेल्या अमेरिकेची 24 व्या स्थानावर घसरण झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List