जग अंतराळात वाटचाल करत आहे, तुम्ही कबरी खोदण्यात व्यग्र आहात, संजय सिंह यांची मोदी सरकारवर टीका

जग अंतराळात वाटचाल करत आहे, तुम्ही कबरी खोदण्यात व्यग्र आहात, संजय सिंह यांची मोदी सरकारवर टीका

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारी गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेदरम्यान देशात वाढती गुन्हेगारी, कायदा आणि सुव्यवस्था, सांप्रदायिक हिंसाचाराच्या मुद्द्यांवरून केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये 94 टक्के वाढ झाल्याचं, ते राज्यसभेत म्हणाले आहेत.

राज्यसभेत बोलताना संजय सिंह म्हणाले की, “संपूर्ण जग अंतराळ वाटचाल करत आहे, तंत्रज्ञानात प्रगती करत आहेत. पण तुम्ही (भाजप सरकार) कबरी खोदण्यात व्यग्र आहात. तुम्ही मशिदीच्या आत मंदिर खोदण्यात व्यस्त आहात.”

ते म्हणाले, “जर तुम्हाला मुघलांचा इतिहास शिकवायचा असेल तर तो शिकवा. पण गृहमंत्री इथे बसले आहेत, मला विचारायचे आहे की, एएसआय संरक्षित संस्था आणि मालमत्ता तुमच्या संरक्षणाखाली आहेत. मग ते ताजमहाल असो किंवा लाल किल्ला. तुमचेच लोक म्हणतात की. आम्ही ते तोडून टाकू, खोदू आणि नष्ट करू.” संजय सिंह म्हणाले की, “चला ताजमहाल पाडूया, लाल किल्ला पाडूया, ब्रिटीशांनी बांधलेले दिल्ली रेल्वे स्टेशन पाडूया. ते म्हणाले, चला देशभर खोदकाम करूया. देशभरातील सर्व रस्ते खोदू आणि सर्व पूल पाडून टाकू.”

संजय सिंह म्हणाले, “जर तुम्हाला देशभरात इतिहास शिकवायचा असेल तर महारांचा इतिहास शिकवा. दलितांना तलावातून पाणी पिण्याची परवानगी नव्हती. कोणत्या मुस्लिमाने म्हटले होते की, दलितांना समोर भांडे बांधून चालावे लागेल. आमच्या शेजारी बसून दलित जेवू शकत नाही, हे कोणत्या मुस्लिमाने म्हटले होते. प्राणी तलावाचे पाणी पिऊ शकतात पण दलित नाही, हेही कोणत्या मुस्लिमाने म्हटले होते.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य
राज्यात एआयमुळे (AI) मुळे बेरोजगारी वाढू शकते, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत व्यक्त...
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग