IPL 2025 – मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला लॉटरी लागली, ‘या’ संघाकडून उतरणार मैदानात

IPL 2025 – मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला लॉटरी लागली, ‘या’ संघाकडून उतरणार मैदानात

आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू होण्यासाठी आता काही तास शिल्लक आहे. तोडफोड फटकेबाजी आणि गोलंदाजांचा आक्रमक पवित्रा पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत. अशातच मुंबईचा स्टार गोलंदाज शार्दुल ठाकूरला लॉटरी लागली आहे. दुबईच्या जेद्दाहमध्ये पार पडलेल्या मेगा लिलाव प्रक्रियेत शार्दुल ठाकूरला कोणत्याच संघाने खरेदी केले नव्हते. परंतु आता शार्दुल ठाकूर आयपीएलमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे.

आयपीएलची फटकेबाजी 22 मार्च पासून सुरू होणार आहे. पहिला सामना गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ऐतिहासिक इडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. त्यामुळे या दोन संघांसह सर्वच संघ विजयाची पताका फडकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच ऋषभ पंतच्या लखनऊ सुपर जायंट्स शार्दुल ठाकूला आपल्या ताफ्यात घेण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकूर हा फक्त गोलंदाज नाही तर वेळ पडल्यास फटकेबाजी करण्याची सुद्धा त्याच्यामध्ये क्षमता आहे. गेल्या काही दिवसांपासून शार्दुल ठाकूर लखनऊ सुपरजायंट्स सोबत सराव करत आहे. मोहसिन खानच्या जागेवर शार्दुल ठाकूरची संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे मोहसिन खान या हंगामातून बाहेर झाला आहे. या संदर्भात लखनऊने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु दिल्लीविरुद्ध होणाऱ्या लखनऊच्या पहिल्या सामन्यात शार्दुल सुद्धा संघासोबत विशाखापट्टनमला जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
Water Taxi in Mumbai: मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार आहे. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी...
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग
जग अंतराळात वाटचाल करत आहे, तुम्ही कबरी खोदण्यात व्यग्र आहात, संजय सिंह यांची मोदी सरकारवर टीका
औरंगजेबाने जेवढे लोक मारले, तेवढेच लोक राज्य सरकारच्या… बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया काय?