रेकॉर्डवर चुकीची माहिती येऊ नये, आदित्य ठाकरे यांनी सभागृहातच मंत्री उदय सामंत यांची चूक दाखवली
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या रस्त्याच्या कंत्राटावरून प्रश्न विचारले. तेव्हा मंत्री उदय सामंत यांनी काही कंत्राटदारांची नावं घेतली. पण यातील एका कंत्राटदाराने काम मागे घेतले आहे, तसेच दक्षिण मुंबईतील कामं बंद झाली आहेत अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच पटलावर चुकीची माहिती जाऊ नये असे म्हणत मंत्री उदय सामंत यांची चूक दाखवून दिली.
विधीमंडळात आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईच्या रस्त्यांच 6080 कोटी रुपयांचं टेंडर आलं होतं. मुंबईतल्या सर्व आमदारांनी, नगरसेवकांनी यावर प्रश्न विचारले होते. माझे दोन प्रश्न आहेत. पालिका 10 टक्के अॅडवान्स मोबिलीटी देणार होती. मुंबईत अशा प्रकारे अॅडवान्स मोबिलीटी दिली गेली नव्हती. ही अॅडवान्स मोबिलीटी दिली आहे का? 6080कोटी ही रक्कम ही पालिकेच्या एकूण टेंडरपेक्षा जास्त होती. टेंडर प्रक्रियेत कुठल्या मुद्द्यावर पुढे गेले होते, तर पालिकेने ठरवेल्या रकमेत कंत्राट दिले आहे की वाढवून दिले आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
त्यावर मंत्री उदय सामंत म्हणाले की, काही ठिकाणी अॅडवान्स मोबिलीटी चार्जेस दिले आहेत. पण सगळ्यांची छाननी करूनच हे चार्जेस दिले आहेत. 6632 कोटी रुपयांची 698 काँक्रीटची कामं आहेत. यातील काही कामं पूर्ण झाली आहेत काही कामं ही प्रगतीपथावर आहेत. या सर्व कामात कुठेही अनियमतता नाही असे सामंत म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषदेतत सांगितले होते की अॅडवान्स मोबिलीटी देणार नाही, आणि आता मंत्री सांगत आहेत की काही ठिकाणी हे पैसे दिले आहेत. हा गोंधळ का? आयुक्तांनी सांगितले की मुंबईत 26 टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामांपैकी किती ठिकाणी हे पैसे दिले गेले आहेत? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला. त्यावर सामंत यांनी किती पैसे दिले हे पटलावर मांडतो असे उत्तर दिले.
यावेळी मुंबईत रस्त्यांची कुणाला कंत्राट देण्यात आली याची यादी मंत्री उदय सामंत यांनी दिली. पण यातील एका कंत्राटदाराने काम मागे घेतले आहे, तसेच दक्षिण मुंबईतील कामं बंद आहेत अशी चूक आदित्य ठाकरे यांनी दाखवून दिली. तसेच ही माहिती पटलावर जाता कामा नये असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List