तयार रहा! 29 मार्चला दिसणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण

तयार रहा! 29 मार्चला दिसणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण

यंदा होळीच्या दिवशी पहिले चंद्रग्रहण पार पडले. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा सूर्यग्रहणाकडे लागल्या होत्या. सूर्यग्रहणाची तारीखसुद्धा जारी करण्यात आली आहे. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण येत्या 29 मार्च 2025 रोजी म्हणजेच चैत्र महिन्याच्या अमावास्येच्या दिवशी दिसणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे सूर्यग्रहण 29 मार्चला दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी सुरू होईल, तर सायंकाळी 6 वाजून 13 मिनिटाला संपेल. म्हणजेच हे सूर्यग्रहण जवळपास चार तास चालेल, परंतु दुर्दैवाने 29 मार्च रोजी हिंदुस्थानात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. हे  सूर्यग्रहण  आंशिक  असेल. वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025 रोजी होईल व ते सूर्यग्रहणदेखील आंशिक सूर्यग्रहण असेल. म्हणजेच चंद्र सूर्याच्या फक्त एका भागाला व्यापणार आहे. आशिया, उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि आर्क्टिकसह जगभरातील अनेक प्रदेश या घटनेचे साक्षीदार होतील. मात्र उत्तर अमेरिकन प्रदेशात सूर्योदयासोबत ग्रहण दिसणार असल्याने या ठिकाणी ग्रहणाचे सर्वोत्तम दृश्य अनुभवायला मिळेल.

कुठे कुठे दिसेल सूर्यग्रहण

l उत्तर अमेरिका ः न्यूयॉर्क (यूएसए), मॉन्ट्रियल
(कॅनडा), हॅलिफॅक्स (कॅनडा), प्रेस्क आयल (यूएसए), ऑगस्टा (यूएसए), सेंट जॉन्स (कॅनडा), कुजुआक (कॅनडा).

l युरोप ः लंडन (यूके), पॅरिस (फ्रान्स), मद्रिद (स्पेन), बर्लिन (जर्मनी), ब्रुसेल्स (बेल्जियम), आम्सटरडॅम (नेदरलँड्स), डब्लिन (आयर्लंड), रेकजाविक (आइसलँड), ओस्लो (नॉर्वे), स्टॉकहोम (स्वीडन), हेलसिंकी (फिनलंड).

l आफ्रिका ः कॅसाब्लांका (मोरोक्को).

l इतर ठिकाणे ः नुउक (ग्रीनलँड), तोर्शवन (फॅरो बेटे), लॉन्गइअरब्येन (स्वालबार्ड, नॉर्वे), बेलुश्या गुबा (रशिया).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
Water Taxi in Mumbai: मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार आहे. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी...
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग
जग अंतराळात वाटचाल करत आहे, तुम्ही कबरी खोदण्यात व्यग्र आहात, संजय सिंह यांची मोदी सरकारवर टीका
औरंगजेबाने जेवढे लोक मारले, तेवढेच लोक राज्य सरकारच्या… बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया काय?