रेनॉच्या कारही 1 एप्रिलपासून महागणार
रेनॉ इंडियाच्या कार सुद्धा 1 एप्रिलपासून महाग होणार आहे. कंपनी कायगर, क्विड आणि ट्राइबरच्या किंमतीत वाढ करणार आहे. ही वाढ दोन टक्क्यांपर्यंत असेल. ही वाढ मॉडल आणि व्हेरियंटनुसार वेगवेगळी असेल. हिंदुस्थानात अनेक प्रमुख कार कंपन्यांनी वाहनांच्या किंमतीत वाढ करणार असल्याची घोषणा याआधीच केली आहे. मारुती सुझुकीने आपल्या वाहनांत 4 टक्के वाढ केली आहे. ह्युंदाई मोटर इंडियाने 3 टक्के वाढ केली आहे. तर टाटा मोटर्स, स्कोडा, महिंद्रा, किआ, ऑडी, एमजी मोटर्स आणि बीएमडब्ल्यूने जानेवारी महिन्यातच किंमत वाढवली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List