घटस्फोट न देता पत्नीने केलं दुसरं लग्न; संतप्त पतीने स्वत:वर पेट्रोल ओतून जीवन संपवण्याचा केला प्रयत्न
इचलकरंजी येथील एका व्यक्तीने पोलीस ठाण्यासमोर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यक्तीच्या पत्नीने घटस्फोट न घेता दुसऱ्याशी लग्न केल्यामुळे तो चांगलाच संतापलेला होता.
शेखर गायकवाड असं या व्यक्तीचं नाव असून पत्नी आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी तो पोलीस ठाण्यात पोहोचला तेव्हा ही घटना घडली.
आपल्या न्याय मिळावा अशी मागणी तो वारंवार करत होता. अखेर अस्वस् असलेल्या गायकवाड यानं पोलीस स्टेशनमधून बाहेर पडून स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं.
स्टेशन परिसरात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तो व्यक्ती वाचला. तो 60 टक्के भाजला होता. सध्या उपचारासाठी कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात त्याला दाखल आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List