Sikandar- ‘सिंकदर’च्या ट्रेलर लाॅंचला सलमान हजेरी लावणार का?

Sikandar- ‘सिंकदर’च्या ट्रेलर लाॅंचला सलमान हजेरी लावणार का?

सलमान खानचा बहुचर्चित ‘सिकंदर’ ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे आणि या टीझरला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. परंतु असे असले तरी सध्याच्या घडीला ‘सिंकदर’च्या प्रमोशनमध्ये अचानकपणे मोठे बदल करण्यात आले आहेत. ‘सिकंदर’च्या प्रमोशनसाठी आधी संपूर्ण टीम 30 हजार चाहत्यांसह ट्रेलर लाँच करण्याची योजना आखत होती, परंतु आता मात्र सर्व कार्यक्रमामध्ये अचानक बदल करण्यात आलेले आहेत.

सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर 23  किंवा 24 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात लाँच होणार होता. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव मात्र सलमान खान या ट्रेलर लाॅंचला उपस्थित राहणार नसल्याचे कळत आहे. सलमान डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे चित्रपटाचे प्रमोशन करणार असल्याचे सांगितले जात आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सलमान खानला कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. असे असले तरी, चाहत्यांनो निराश होऊ नका. या चित्रपटाचा ट्रेलरही डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोठ्या थाटामाटात लाँच होणार आहे. ट्रेलर लाँच झाल्यानंतर चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू होईल. एकूणच काय तर, पडद्यावरचा टायगर आता खाजगी जीवनात डिजिटल ट्रेलर लाॅंचिंगला उपस्थित राहणार आहे.

सलमान खानला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे सलमानला पोलीसांकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींनुसार सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळेच कोणत्याही मोठ्या कार्यक्रमा ठिकाणी सलमान सध्याच्या घडीला दिसत नाही. सलमान खान याने कायमच ईदच्या निमित्ताने त्याचा जलवा दाखवला आहे. यंदाच्या ईदला सिंकदर मोठ्या पडद्यावर कसा परफाॅर्म करणार हे पाहणे आता औत्सुक्याचे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
Water Taxi in Mumbai: मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार आहे. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी...
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग
जग अंतराळात वाटचाल करत आहे, तुम्ही कबरी खोदण्यात व्यग्र आहात, संजय सिंह यांची मोदी सरकारवर टीका
औरंगजेबाने जेवढे लोक मारले, तेवढेच लोक राज्य सरकारच्या… बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया काय?