औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे. आपल्या याचिकेत त्यांनी म्हटलं आहे की, “औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नाही, त्यातून पुढच्या पिढीला वारसा किंवा शिकवण घेण्यासारखं काहीही नाही.”
केतन तिरोडकर यांनी केंद्रिय पुरातत्व विभागाला ऐतिहासिक वास्तूंच्या यादीतून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. आपल्या याचिकेत त्यांनी म्हटलं आहे की, “कबर पुरातत्व विभागाच्या यादीतून वगळली की राज्य सरकारनं ती तिथून कायमची हटवून टाकावी, जेणेकरून भविष्यात पुन्हा यावरून जातीय तेढ निर्माण होणार नाही.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List