Periods- मासिक पाळीच्या दिवसांमध्ये, तुमच्याही पोटात मुरडा येतो का? मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी प्या ग्रीन टी!
आपल्या प्रत्येकाचं शरीर हे वेगळं आहे. त्यामुळेच आपल्याला होणारे त्रासही वेगळेच असतात. अनेकजणींना मासिक पाळी येण्याआधी किंवा पाळी सुरु असताना काहीच त्रास होत नाही. तर दुसरीकडे मात्र हे चित्र अगदी उलट दिसते. मासिकपाळी आधी आणि पाळी सुरु असताना, काहीजणींना इतके क्रॅम्प येतात की विचारता सोय नाही. असं म्हणतात की, ग्रीन टी प्यायल्याने मासिक पाळीतील क्रॅम्प खूप कमी होतात. यामागची कारणं आपण जाणून घेऊया.
ग्रीन टी पिल्याने मासिक पाळीच्या वेळी होणारे क्रॅम्प कमी होतात का?
वजन कमी करण्यासाठी बहुतेक जण ग्रीन टी पितात. परंतु ग्रीन टी मासिक पाळीमध्ये सुद्धा उपयुक्त आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ग्रीन टी पिल्याने मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या क्रॅम्प्सपासून आराम मिळतो. खरंतर, ग्रीन टीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळेच मासिकपाळीतील पोटदुखी कमी होण्यासाठी ग्रीन टी पिणे हितावह मानले जाते. याव्यतिरिक्त, ग्रीन टीमध्ये असलेले संयुगे पोटाला आराम देतात, ज्यामुळे मासिक पाळीच्या वेळी होणारे क्रॅम्प कमी होतात.
ग्रीन टी पिण्यामुळे पाळीदरम्यान शरीराला येणारी सूज कमी होते. तसेच पोटात मुरडा येण्याचे प्रमाणही कमी प्रमाणात सुरु राहते. ग्रीन टीमधील अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक अशा जळजळ कमी करण्यास मदत करतात.
मासिक पाळी दरम्यान ग्रीन टी पिल्याने गर्भाशयातील जळजळ कमी होते आणि वेदनाही कमी होतात.
मासिक पाळीमध्ये पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी, तुम्ही फक्त एक किंवा दोन कप ग्रीन टी घेणे हितावह आहे. कोणत्याही प्रौढ व्यक्तीने यापेक्षा जास्त ग्रीन टी पिणे योग्य नाही.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List