प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला, कोरटकरची उच्च न्यायालयात धाव
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी प्रशांत कोरटकरचा जामीन नाकारला होता. आता कोरटकरने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कोल्हापूर पोलिसांनी नागपुरात कोरटकरच्या घरी छापा मारला. पण तरीही पोलिसांना तिथे कोरटकर सापडला नाहीये. दुसरीकडे सत्र न्यायालयाने कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने कोरटकरने हायकोर्टात धाव घेतली आहे. प्रशांत कोरटकरला पोलिसांनी फोन जमा करायचा आदेश दिला होता. पण प्रशांत कोरटकरने आपल्या फोन मधील सगळा डेटा आधीच डिलीट केला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List