शत्रूंची आता खैर नाही, लष्कराला मिळणार स्वदेशी अटाग्स तोफ
देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. हिंदुस्थानी लष्कराला 307 अत्याधुनिक टोड आर्टिलरी गन सिस्टम म्हणजेच अटाग्स तोफ खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या अत्याधुनिक गन्सची रेंज 48 किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजेच याचा वापर थेट युद्धाच्यावेळी हिंदुस्थानच्या सीमेवरून चीन किंवा पाकिस्तानी शत्रूंवर तुफानी हल्ला करता येवू शकतो. देशाच्या संरक्षणासाठी सीसीएसने जवळपास 7 हजार कोटी रुपयांच्या स्वदेशी अटाग्सच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारचे हे पाऊल म्हणजे आत्मनिर्भर भारतसाठी घेतलेला मोठा निर्णय समजला जात आहे. या तोफेचा वापर सर्व हवामानात केला जावू शकतो. कारण, याची डिझाईन प्रत्येक हवामानासाठी करण्यात आली आहे. ही गन लष्करासाठी पूर्णपणे फीट समजली जाते. याची चाचणी पोखरणच्या वाळवंटापासून सिक्कीमच्या डोंगराळ भागात यशस्वीपणे करण्यात आली आहे. या तोफेला मंजुरी मिळाल्यानंतर आत्मनिर्भर भारतला प्रोत्साहन मिळणार आहे. अटाग्स गनला हिंदुस्थानात डेव्हलप करण्यात आले असून त्याची डिझाईन सुद्धा देशातच बनवण्यात आली आहे.
काय आहे स्वदेशी तोफेत
अटाग्स ही देशी तोफ आहे. 55 एमएम 52 कॅलिबरच्या या तोफेने लागोपाठ 60 मिनिटांत 60 राऊंड गोळे डागू शकतो. या तोफेचे आणखी एक खास वैशिष्टये म्हणजे ही जगातील अशी एकमेव तोफ आहे. जी 48 किलोमीटरपर्यंत शत्रूंच्या आणि त्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त करू शकते. ही तोफ जगातील सर्वात शक्तिशाली असलेल्या रेंजपैकी एक आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List