शेम… शेम… भाजप आमदारानं श्वानाचं नाव शंभू ठेवलं! अनिल परब यांनी महायुती सरकारला घेरलं
छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना केल्याच्या आरोपाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये खणखणीत उत्तर देत महायुती सरकारला घेरले. छत्रपती संभाजी महाराज आमचे दैवत असून दैवतांशी स्वत:ची तुलना कधी करू शकत नाही, असे अॅड. अनिल परब म्हणाले. उलट भाजप आमदारानेच आपल्या श्वानाचे नाव शंभू ठेवले, असा आरोप करत परब यांनी विधान परिषद दणाणून सोडली.
छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे. त्यांच्या पायावर डोके ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही. ते माझे देव असून मी काय बोललो हे तपासून पहा. मी अपमान केला असे वाटत असेल तर सभापतींना अधिकार आहे तो कामकाजातून काढून टाकायचा. कुणीही उठतंय आणि बोलतंय… सभागृहाच्या मर्यादा दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजे, असे अनिल परब म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी केला, आमचा छळ पक्ष बदलण्यासाठी केला, असे बोललो. यात चुकीचे काय बोललो? असा सवाल अनिल परब यांनी केला. पण याच सभागृहातील एका सदस्याने आपल्या श्वानाचे नाव शंभू ठेवले. त्याची माफी मागणार का? कोरटकर, सोलापूरकरचा विषय बाजूला काढण्यासाठी हा विषय पुढे करण्यात आला आहे, असेही परब म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List