तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते; उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला

तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते; उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला

नागपूरमध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन दिले. त्यानंतर गद्दार उपमुख्यमंत्री याबाबत बोलले. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब बोलत असतानाही मिंधे मध्ये बोलण्याचा आणि परब यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. त्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत मिंधे जो करत होते, त्याला आक्रमकपणा नाही, तर भेदरटपणा म्हणतात, अशा शब्दांत मिंध्यांना सणसणीत टोला लगावला.विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप, मिंधे आणि सत्ताधाऱ्यांची सालटी काढली.

पत्रकारांनी यावेळी, तुम्ही आणि अनिल परब पंतप्रधानांना भेटायला गेला होता. त्याचा उल्लेख शिंदे यांनी केला असे सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मिंधेना आणखी एक जबरदस्त टोला लगावला. आम्ही मोदींना भेटायला गेलो होतो, तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबीनमध्ये बसले होते, ते आम्हाल कळलेच नाही, असे उत्तर देत मिंध्यांना जबरदस्त तडाखा देत टोला लगावला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी नागपूर घटनेबाबतही प्रतिक्रिया दिली. भाजपच्या मंत्र्यांच्या मुलांनी हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट सामने भरवायचे आणि ते दुबईत जाऊन पाहायचे देखील. आणि इथे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्यावर राजकारणाची पोळी भाजायची हे घृणास्पद आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेबाला व बलाढ्य सत्तेला नमवून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. महाराजांच्या निधनानंतर तो औरंगजेब स्वराज्यावर चालून आला होता. औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता पण महाराष्ट्राच्या मातीचा कणही जिंकू शकलेला नाही. महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या महाराष्ट्राने, छत्रपती संभाजी महाराज, रामराजे महाराज, राणी ताराराणी व असंख्य मावळ्यांनी त्याला मूठमाती दिली. थोडक्यात काय औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता पण तो इथल्या मातीचा कणही जिंकू शकला नाही. महाराष्ट्राने त्याला मूठमाती दिली. अशा औरंगजेबाचं समर्थन कुणी शिवप्रेमी करणार नाही. त्यामुळे जर कुणी त्याचं थडगं उकरण्याची भाषा करत असेल तर डबल इंजिन सरकार काय नुसतं वाफा सोडतंय का? मुख्यमंत्र्यांनी ही कबर उद्ध्वस्त करण्यास असमर्थता दाखवली आहे. त्याला केंद्रांचं संरक्षण आहे.

केंद्र सरकार जर औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देत असेल तर तो औरंगजेब तुमचा कोण लागतो? औरंगजेब असो अफजलखान असो हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचे तर तुम्ही आंदोलन काय करताय? मोदींकडे जा व सांगा गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब ज्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा व तो सोहळा कराल तेव्हा नितीश बाबू व चंद्राबाबूंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई – पुणे एक्प्रेस वेवरील प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून टोलच्या रकमेत 3 टक्क्यांची वाढ मुंबई – पुणे एक्प्रेस वेवरील प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून टोलच्या रकमेत 3 टक्क्यांची वाढ
मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिलपासून टोलच्या दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या महामार्गावर वाहनधारकांकडून घेतल्या जाणाऱ्या...
माथेरानच्या इतिहासात पहिल्यांदाच शुकशुकाट, पर्यटकांच्या लुटमारीविरोधात कडकडीत बंद
विधान परिषदेची उमेदवारी डावलल्याने भाजपमध्ये धुसफुस, प्रादेशिक समतोल साधण्याऐवजी फडणवीस यांनी केले स्वत:च्या समर्थकांचे पुनर्वसन
पुण्यात कोयता गँग अस्तित्वात नाही, ‘भाई’ होण्याच्या आकर्षणापोटी कोयत्याचा वापर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
महापालिका निवडणुकांआधी मतदार ओळखपत्रे आधारशी लिंक करा, शिवसेनेची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
मुंबईची तहान भागवण्यासाठी सरकारने 500 एमएलडी अतिरिक्त पाणी तातडीने द्यावे, सुनील प्रभू यांची मागणी
प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग अखेर मोकळा, कोल्हापूर न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळला