रसगुल्ला खाताच जमिनीवर कोसळला आणि मरण पावला, काय घडलं नेमकं?
रसगुल्ला खाताच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वाल्मिकी प्रसाद असे मयत व्यक्तीचे नाव आहे. बिहारमधील शेखपुरा येथील कुसुंभा गावात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
वाल्मिकी प्रसाद एका खटल्यासाठी कोर्टात गेले होते. तेथे कोर्टाच्या प्रक्रियेला उशिर होत होता. वाल्मिकी यांना खूप भूक लागली होती. त्यामुळे ते तेथील एका हॉटेलमध्ये गेले आणि रसगुल्ले ऑर्डर केले.
वाल्मिकी यांनी रसगुल्ला खाताच तो त्यांच्या गळ्यात अडकला. यामुळे त्यांचा श्वास गुदमरला आणि त्यांचा मृत्यू झाला. वाल्मिकी जमिनीवर कोसळल्यानंतर तेथे उपस्थित लोकांनी त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. वाल्मिकी यांचा मृत्यू झाला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List