नागपूर दंगलीनंतर पोलीस अलर्ट मोडवर, औरंगजेबच्या कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कडक बंदोबस्त

नागपूर दंगलीनंतर पोलीस अलर्ट मोडवर, औरंगजेबच्या कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कडक बंदोबस्त

औरंगजेब कबर प्रकरणावरील वादाला नागपुरात सोमवारी रात्री हिंसक वळण लागून दंगल उसळली. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करीत दुपारी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सायंकाळी दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादावादीने दोन्ही गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेनंतर आता खुलताबादमध्ये औरंगजेबच्या कबरीकडे येणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

औरंगजेब कबर प्रकरणावरून संपूर्ण देशभरात पडसाद उमटले. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून मोर्चाही काढण्यात आला. यानंतर नागपूरात झालेल्या दंगलीमुळे खुलताबाद येथील औरंगजेब कबरीकडे येणाऱ्या रस्त्यांवर पोलीसांनी बँरीकेट लावले आहेत. राज्यात सध्या तणावाचे वातावरण झाल्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत.

दरम्यान, दर्गेत कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचीही कसून चौकशी केली जात आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची, पर्यटकांची पोलीस चौकशी करत आहेत. तेथे येणाऱ्या प्रत्येकाचे नाव, नंबर, आधारकार्ड तपासले जात असून त्यांची नोंद घेतली जात आहे. तसेच कबर परिसात मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या राज्यात सुरू असलेल्या वातावरणामुळे पर्यटकांमध्ये घट पाहायला मिळत आहे. सोमवारी झालेल्या दंगलीमुळे मंगळवारी दुपारी 12 पर्यंत फक्त 9 पर्यटकांनी कबरीला भेट दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुख्यमंत्री म्हणाले नागपूर दंगल पूर्वनियोजित; सोशल मीडियावर ‘चल दंगल समजून घेऊ’ कविता पुन्हा चर्चेत मुख्यमंत्री म्हणाले नागपूर दंगल पूर्वनियोजित; सोशल मीडियावर ‘चल दंगल समजून घेऊ’ कविता पुन्हा चर्चेत
नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या दंगलीवरून विरोधकांनी विधिमंडळात सरकारला धारेवर धरले. अखेर नागपूर दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. यावेळी...
Buldhana News – पाडकाम करताना घर अंगावर कोसळलं, बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू
गुहागरच्या खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात बोगस प्रवेश अन् करोडोंचा गैरव्यवहार, भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप
निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदान कार्ड ‘आधार’शी लिंक करण्याचा निर्णय
सरकारचे अपयश लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला औरंगजेबाची कबर आठवते का? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
…तेथे बांधकाम सुरु होते त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची धार वाढली, नागपूर पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम