‘बाल आशीर्वाद योजना’ नावाने होतेय फसवणूक; अशी कोणतीही योजना नसल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘बाल आशीर्वाद योजना’ नावाने होतेय फसवणूक; अशी कोणतीही योजना नसल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशा नावाने योजना असल्याचे समाजमाध्यमावर पसरवून फसवणुक होत आहे. याबाबत रत्नागिरी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष वेधत फसवणूकीपासून सावध रहाण्याचा सल्ला दिला आहे.

महिला व बाल विकास विभागाकडून ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून, हा संदेश केवळ अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता बाळगावी. अशा अफवा असलेल्या सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे.

‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशी योजना असल्याचे भासवून समाजमाध्यमांद्वारे काही संदेश प्रसारित होत आहेत. असे वृत्त केवळ अफवा असून, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये व फसवणुकीला बळी पडू नये. या प्रकारच्या फसव्या संदेशांमध्ये 1 मार्च 2020 नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 2 मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा 4 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर अर्ज भरून जिल्हा बाल संरक्षण कक्ष/जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असा मजकूर प्रसारित करण्यात येत आहे. ही केवळ अफवा असल्याचे श्रीकांत हावळे यांनी सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…तेथे बांधकाम सुरु होते त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची धार वाढली, नागपूर पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम …तेथे बांधकाम सुरु होते त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची धार वाढली, नागपूर पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम
नागपूर हे निसर्गाचे वरदान असणारे टुमदार शहर काल सुर्यास्तानंतर दगडफेक आणि जेसीबी वाहनांच्या धुराने अचानक वेढले. दोन्ही बाजूंनी जमावाने घोषणाबाजी...
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर लोटांगण घातले? कोणी केला आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
कुणी तरी येऊन सांगितलं… चला हिंदूंना मारायला… मुस्लमानांना…; किरण मानेची नागपूर दंगलीवरून टीका
Ratnagiri News – पर्यटकांसाठी करमणुकीची नवी मेजवानी! थिबा पॅलेस येथे मल्टिमीडिया शो सुरू
रसगुल्ला खाताच जमिनीवर कोसळला आणि मरण पावला, काय घडलं नेमकं?
छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला; अटक होण्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 357 गावातील 722 वाड्यांमध्ये पाणीटंचाईची शक्यता; संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार